जिव्हाळा परिवाराने केला अहमदपूर पोलीस स्टेशन मधील कोरोना योध्यांचा सन्मान

जिव्हाळा परिवाराने केला अहमदपूर पोलीस स्टेशन मधील कोरोना योध्यांचा सन्मान

अहमदपूर (गोविंद काळे) : जिव्हाळा परिवाराच्या वतीने अहमदपूर येथील पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी कर्मचारी यांना मास्क, सँनिटाझर, सन्मानपत्र देऊन सन्मान त्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक आदरणीय श्री नानासाहेब लाकाळ साहेब, यांच्या सह पोलीस स्टेशन मधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पोलिस अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी सुध्दा कोरोनाच्या संकटकाळात स्वतःची आणि कुटुंबाची पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेची रात्र दिवस सेवा करत आहेत.या कोरोनाच्या काळात उत्कृष्ट सेवा आणि कार्य केल्याबद्दल त्यांचे कोरोनापासून संरक्षण आणि केलेल्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी अहमदपूर पोलीस ठाण्यातील सर्वच अधिकारी कर्मचारी यांना मास्क, सँनिटाझर, आणि सन्मान पत्र देऊन त्यांचा जिव्हाळा परिवाराच्या वतीने या कोरोनासाठी लढा देणाऱ्या या कोरोना योद्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पोलीस स्टेशन मधील श्री चौधरी साहेब,भास्करजी सूर्यवंशी साहेब, श्री राजपाल जी गुट्टे साहेब, धर्मपालजी गुट्टे साहेब, यानी परिश्रम आणि अनमोल सहकार्य केले.या कार्यक्रमाला जिव्हाळा परिवारातील राजकुमारजी वाडकर,चंद्रकांतजी नकाते, दैवशाला ताई ततापूरे कौशल्या ताई पवार, कामाक्षी ताई पवार, रंजना ताई गायकवाड, गायकवाड सर आणि जिव्हाळा परिवाराचे प्रमुख सटवाजी कांबळे पाटोदेकर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!