डॉक्टर, नर्स, आशा कार्यकर्ती, सेवक या कोव्हीड योध्दांचा माजी मंञी विनायकराव पाटील यांच्या हस्ते सत्कार

डॉक्टर, नर्स, आशा कार्यकर्ती, सेवक या कोव्हीड योध्दांचा माजी मंञी विनायकराव पाटील यांच्या हस्ते सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : हाडोळती येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोव्हिडमध्ये काम केलेल्या डाॕक्टर नर्स आशा कार्यकर्ती व सेवक यांचा माजी मंञी तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य विनायकराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पंतप्रधान पदाचे सात वर्षे यशस्वीरित्या पुर्ण केले असल्याचमुळे त्याचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोवीड च्या महामारीत अनेक समाज घटकांनी मोलाचं कार्य यावेळी केले आहे त्यामधील डॉक्टर,परीचारीका, आशा वर्कर, सेवक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी हडोळती ग्रामपंचायत चे सेवक वैजनाथ कांबळे यांचा पुजन करुन सत्कार माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी सभापती हरीभाऊ येरमे, राजाभाऊ मजगे माधवराव पाटील, निळकंठ पाटील, गोविंद गिरी, अमित रेड्डी , राजुकुमार खंदाडे, राहुल शिवपुजे, रामभाऊ नरवटे, चंद्रकांत गंगथडे, माधव पवार, संतोष पवार, पिंटू भोगे, राम मुळके , गणेश पवार, बाळुआप्पा मुरके, ईसाक अकोले ,माणीक बारूळे, निळकंठ ह़बीर, प्रदीप धामणे, महेश बिलापट्टे, शिवानंद भोसले, अलादोन किनीवाले, संजय मिरजगावे, संगम कुमदळे, अदी मान्यवर ऊपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!