आक्का मुळे लातूर जिल्ह्यात भाजपाचा वटवृक्ष बहरला– पंडितराव सुकणीकर
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजयी शिलेदार म्हणून रूपाताई पाटील निलंगेकर उर्फ आक्का यांना ओळखले जाते. पारंपारिक काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यात खासदार म्हणून आक्का निवडून आल्या आणि भाजपची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर जिल्ह्यामध्ये विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था हळूहळू भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्या. असे विचार भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष पंडितराव सुकणीकर यांनी व्यक्त केले. माजी खासदार भाजपच्या नेत्या रूपाताई पाटील निलंगेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर ते बोलत होते. आक्काने लावलेल्या भाजपचा वटवृक्ष करण्याचे श्रेय आ. संभाजी भैय्या पाटील निलंगेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश अप्पा कराड, खा. सुधाकरराव शृंगारे आ. अभिमन्यू पवार यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना जाते.
जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचा घराघरात कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे. यादृष्टीने आ. संभाजी भैय्या पाटील निलंगेकर आणि आ. रमेशप्पा कराड यांनी जी मोहीम राबवली आहे, ही उल्लेखनीय आहे. असेही याप्रसंगी सुकणीकर यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचार मुक्त आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारा पक्ष म्हणून आज भारतीय जनता पक्ष लोकांच्या मनात घर करून राहिला आहे. असेही त्यांनी सांगितले.