मेहकर पोलिसांची दबंगगिरी… मोटार सायकल चोरांना दाखवली जेलची वारी

मेहकर पोलिसांची दबंगगिरी... मोटार सायकल चोरांना दाखवली जेलची वारी

भालकी (भगवान जाधव) : गेल्या काही दिवसापासून बिदर जिल्ह्यात भालकी तालुक्यातील मेहकर परिसरात मोटार सायकल चोरीचे प्रमाण अधिक वाढत असल्याने परिसरात मोटार सायकल चोरीने येथील जनता हैराण झाली होती या सर्व बाबी विचारात घेऊन वारंवार लोक ठाण्याकडे धाव घेऊन तक्रार करायचे मगकाय गुन्हेगरांचा कर्दन काळ बनून मेहकर पोलिस ठाण्याचे पी एस आय नंदकुमार मुळे यांनी सूत्र हलविले तसेच आपल्या वरिष्ठ अधिकारी डी वाय एस पी देवराज सर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार केली आणि परिसरातील किती गाड्या चोरीस गेल्या याची माहिती काढली व आपले चक्र फिरवली हल्लीच वांजारखेडा गावातील एक गाडी चोरीस गेलेली माहिती मिळताच त्यांनी आपल्या टीमसोबत औराद पोलिस ठाणे गाठले व येथील ए पी आय सुधीर सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने एका आरोपीस पकडुन त्यास खाकीचा हिसका दाखविल्यानंतर त्याने एक दोन गाड्यांची चोरी केल्याचे कबुली दिली परत दुसऱ्या दिवशी तीन गाड्यांची कबुली दिली असा एकूण पाच गाड्या जप्त करण्यात आले याची एकूण अंदाजे किंमत दोन ते अडीच लाख रुपये आहे या चोरीमध्ये एकूण दोन मुख्ये आरोपीवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा अवघ्या चोवीस तासात मुद्देमाल जप्त करून पी एस आय मुळे यांनी मोलाची कामगिरी बजावली.आणि त्यांना बीदर जेलची हवा दाखवण्यात आली. या कामगिरीत पी एस आय नंदकुमार मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलिस ठाण्याचे ए एस आय चंद्रशेखरराव, cpc ईकेश, cpc बिरप्पा, cpc शशी कुमार, गौस यांनी परिश्रम घेऊन आरोपींना अटक केले याबद्दल परिसरात सर्व त्र त्यांच्या कामगिरीची चर्चा होत आहे आणि सर्वांचे कौतुक केले जात आहे.

About The Author

error: Content is protected !!