बालाघाट तंत्रनिकेतनमध्ये लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा केंद्रीय ग्रामविकास मंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त संचालिका शिवलीताई हाके व प्राचार्य नितीन शिवपुजे सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
साहेबांच्या आठवणींना उजाळा देताना शिवालीकाताई म्हणाल्या वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी गोपीनाथ मुंडे यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाली आणि या संधीचं सोनं साहेबांनी केलं. भारतीय जनता पार्टीचा चिमूटभर असलेला विस्तार मुंडे साहेबांनी अठरा पगड जातींना गोरगरीब कष्टाळू जनतेला सोबत घेऊन वाडी-वस्त्यात, खेड्यापाड्यात,घराघरात पोचवण्याचे काम केलं. अभ्यासू व आक्रमक स्वभावामुळे विरोधी पक्षनेत्या ची माळ गळ्यात पडताच भल्याभल्यांना घाम फोडण्याचे काम साहेबांनी केलं. भ्रष्टाचार संपविला. गोरगरीब बहुजन समाजातील लोकांना राजकारणात आणून आमदार खासदार करण्याचे काम साहेबांनी केलं.
हाच तो दिवस आहे गोरगरीब जनतेचा सुख हिरावून नेण्याचं काम केलं परंतु त्यांच्या कार्यामुळे आजही मुंडे साहेब गोरगरीब जनतेच्या तसेच कार्यकर्त्याच्या मनामध्ये, विचारांमध्ये जिवंत आहेत. यावेळी श्री सिद्धू मासुळे, श्री बालाजी देवकते, श्री सतिष केंद्रे, श्री संतोष होनमाणे, श्री कैलास होनमाने, श्री अशोक चव्हाण,श्री भरत दुधाटे, श्री शिवदास देवकते आदींनी अभिवादन केले.