राजकारणात बहुजन समाजाला मूंडे साहेबांनी मोठी संधी दिली – डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी

राजकारणात बहुजन समाजाला मूंडे साहेबांनी मोठी संधी दिली - डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी

अहमदपूर (गोविंद काळे) : राज्याच्या राजकारणात गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी उपेक्षीत आणी बहुजन समाजाला जाणीवपूर्वक सोबत घेवून मोठ्या प्रमाणात संधी दिल्यानेच ‘मास लीडर’ अशी स्वतःची ओळख त्यांची निर्माण झाली असे प्रतिपादन युवकनेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले. सम्राट मित्रमंडळाच्या वतीने गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ नगरसेवक संतोषभाऊ शेप होते तर प्रमूख पाहुणे म्हणून गणेश मुंडे, गजानन मुंडे, प्रकाश केंद्रे गुरूजी, पत्रकार गणेश मदने, बालाजी पारेकर, अजय भालेराव आदींची उपस्थिती होती. पूढे बोलताना डॉ.सूर्यवंशी म्हणाले की, कुठल्याही नेत्याच्या जयंती अथवा पुण्यतिथी साजरा करीत असताना या नेत्यांचा इतीहास समाजापूढे मांडला गेला पाहीजे तरच येणाऱ्या नवीन पिढीला त्यांचं मोठेपण समजून येवू शकते. असे उपक्रम वेगवेळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साजरे झाले पाहीजे असे अवाहन ही शेवटी केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक गजानन मूंडे यांनी केले. तर अध्यक्षीय समारोप संतोषभाऊ शेप यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शरद सोनकांबळे यांनी केले.तर आभार अजय भालेराव यांनी मानले. यावेळी चिंतामणी यवंदगे, डाॅ. मधूसूदन चेरेकर, प्रशांत जाभाडे, बालाजी सूर्यवंशी, गणेश मूंडे, कैलास भालेराव, शेख मतीन, बालाजी मस्के, शरद कांबळे, रवी गायकवाड आदींची उपस्थिती होती.

About The Author