अवैध खाटीक खाणे व खानावळींवर कार्यवाही करा;अन्यथा हाळी आणि हंडरगुळी येथे एक जुन रोजी रास्ता रोको आंदोलन.युवकांची सी.एम.कडे तक्रार
हंडरगुळी (विठ्ठल पाटील) : हाळी व हंडरगुळी ता.उदगीर येथे अनेकजण खाटीकखाने व बिर्याणी खानावळी चालवतात.पण यापैकी बहूतांश लोकं हे धंदे विनापरवाना खुलेआमपणे सुरु केले आहेत.अशा धंद्यावर कार्यवाही होणे गरजेचे असतानाही संबंधित खाते “गप्पगार” का?तसेच जि. प. शाळेच्या आजुबाजुस व विविध देवी,देवतांच्या मंदीराकडे जाणा-या रोडवरच हे खाटकं घाण पाणी,माॅंस व हाडं टाकतात.यामुळे महिलाभक्त व चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.म्हणुन अवैध पणे चालणारे खाटीकखाणे व बैल बिर्यानीचे खाणावळींवर संबंधित विभागाने कार्यवाही करावी.अन्यथा १ जुन २३ रोजी रास्ता रोको करणार असल्याचे निवेदन मा.तहसीलदार यांचे द्वारा मुख्यमंञी यांचेकडे अंदाजे ५० युवकांनी दिले आहे.तेंव्हा अवैध खाटीक व खाणावळींवर संबंधित खाते कधी व कोणती कार्यवाही करणार.याकडे हाळीहंडरगुळीतील जनतेचे लक्ष लागले आहे.. याबाबत थोडक्यात माहिती अशी की आजकाल चहा व पानाची टपरी सुरु करायची झाली तर संबंधित खात्याचे लायसन्स घ्यावे लागते.अन्यथा त्या- त्या विभागाचे कर्तबगार अधिकारी कडक कार्यवाही करतात.पण हाळी व हंडरगुळी येथे अनेक कसाई पशु व पक्षी {कोंबडे,बकरे,म्हैस,हल्या व बैलं} यांची कत्तल व विक्री करतात. पण या कसायांपैकी अनेकांकडे पशु पक्षांची कत्तल करायचा व विकायचा परवानाच नाही.असता तर दर्शनी भागात लावला असता.अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका खाटकाने दिली आहे.तसेच पशु अण् पक्षांची कत्तल करण्यापुर्वी गुरांच्या तज्ञ डाॅक्टर कडुनच तपासणी करणे गरजेचे आहे.तरी सुद्धा एकही कसाई अशी तपासणी करत नाहीत.व रोगट पशु,पक्षांची कत्तल व विक्री करतात. अशी चर्चा हाळीकर जनता करते. तसेच हे कत्तलखाणे व खाणावळी हंडरगुळीच्या जि.पं.मुला-मुलींच्या शाळेस लागुनच आहेत.यामुळे चिमुकल्यांना घाणवास सहन करतच शिकावे लागते.परिणामी चिमुकल्या मुलांच्या आरोग्याचे कांही बरे वाईट झाल्यास याला जिम्मेदार कोण? तसेच हे खाटीकखाणे व खाणावळी हंडरगुळीतील विविध मंदीराकडे जाणा-या रोड लगतच आहेत.व या रोडवर घाणपाणी,हाडं,माॅंस,रक्त आदी वेस्ट माल “मुजोर” बिर्याणी खाणावळ चालक या रोडवर टाकत असल्याने मंदीरात ये-जा करणा-या भाविकांना हाडं,माॅंस आदी तुडवत ये-जा करावे लागते.व या बाबत ग्रा.पं.पण कांहीच लक्ष देत नसल्याने हंडरगुळी येथील युवकांनी याची रितसर तक्रार सी.एम मंञालय,मुंबई यांचेकडे मा.तहसीलदार मार्फत दि.१७-५-२३ रोजी केलीआहे साधी चहा व पानाची टपरी टाकायचे तर परवाना लागतो.तर मग मागील कित्येक वर्षापासुन विनापरवाना कुणाच्या आर्शिवादावर खाटीकखाणे व खाणावळी चालतात?असा सवाल हाळीत चर्चीला जात असुन,याबाबत संबंधित विभागाने 31 मे 23 पर्यंत खाटीक व खाणावळींवर कार्यवाही नाही केल्यास 1 जुन 23 रोजी भव्य असा रास्ता रोको केला जाईल.अशा प्रकारचा इषारा हंडरगुळीतील ५० “यंगस्टार” ने दिला आहे.तेंव्हा या बाबत संबंधित खाते व कर्तबगार अधिकारी कधी व कोणती कार्यवाही करतात.याकडे हाळी व परिसरातील जनतेचे लक्ष लागले असुन,उघड्यावर व विनापरवाना चालणारे खाणावळी व माॅंस विक्री यांना कायद्याचा कडक “हाबाडा” द्यायलाच पाहीजे.असा सुर ञस्त जनता काढत असुन,आता सं.. अधिका-याची “अॅक्शन-रिऐक्शन” काय?हे पाहणे म्हत्वाचे आहे…. तसेच या निवेदनाची एक प्रत i.p.s. सिंघम स.पोलीस अधिक्षक निकेतन कदम यांचेकडे आॅनलाईन दिलीअहे.
