टागोर शिक्षण समितीच्या दोन शिक्षकांचा सेवानिवृत्ती निमित्त गौरव सोहळा; शिक्षक हा कायमस्वरूपी विद्यार्थी असतो, आमदार विक्रम काळे यांचे प्रतिपादन
अहमदपूर ( गोविंद काळे) : अनादी काळापासून शिक्षकांना समाजामध्ये मान सन्मान असल्याचे सांगून शिक्षक हा सेवानिवृत्त झाला तरी तो ज्ञानाचा झरा असतो, शिक्षक हा ज्ञानाचे विद्यापीठ असते. म्हणूनच सर्व क्षेत्रांमध्ये शिक्षक हा कायमस्वरूपी विद्यार्थी असून तो सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील तो समाज सेवक असतो असे प्रतिपादन मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी केले.
ते दि. 31 रोजी संस्कृती मंगल कार्यालयात महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कबन सांगवी तालुका चाकुर चे प्राचार्य रमाकांत कोंडलवाडे आणि यशवंत विद्यालया चे पर्यवेक्षक दिलीप गुळवे यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी टागोर शिक्षण समितीचे सचिव डी.बी.लोहारे गुरुजी, प्रमूख अतिथी म्हणून आमदार बाबासाहेब पाटील, टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोकराव सांगवीकर, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सांब महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, काँग्रेसचे प्रदेश सदस्य एडवोकेट हेमंत पाटील, प्राचार्य व्ही व्ही गंपले, प्रा. अंकुश नाडे, महेश आंबेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की शिक्षक नी जीवनभर सकारात्मक कार्य करावे, वाचन, चिंतन, मनन करून समाजाचे लोक प्रबोधन करावे असे जाहीर आवाहन केले.
यावेळी सत्कार संयोजन समितीच्या वतीने श्रीयुत रमाकांत कोंडलवाडे, सौ कांता कोंडलवाडे, श्रीयुत दिलीप गुळवे, सविता गुळवे यांचा आमदार विक्रम काळे व आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सेवापूर्ती च्या निमित्ताने शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि भर आहेर देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सहशिक्षक राम तत्तापुरे, शिवानंद हेंगणे यांचे मनोगत पर भाषणे झाली.
प्रास्ताविक प्राचार्य व्ही व्ही गंपले यांनी सूत्रसंचालन शरद करकनाळे यांनी तर आभार कपिल बिराजदार यांनी मांनले.
या सत्कार सोहळ्याला उपप्राचार्य गिरीधर घोरबांड, उपमुख्याध्यापक उमाकांत नरडेले, पर्यवेक्षक गजानन शिंदे ,बीड चे प्राचार्य मोहन गुळवे, प्रा.डॉ. शोभा गुळवे, अमेरिकेतून राहुल टाले, विनोद सोमवंशी, शिवानंद राऊत, राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार विजेते रामकिशन सुरवसे यांच्यासह विविध शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, यांच्यासह शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.