श्री संत गोरोबा नागरी सहकारी पतसंस्था म.उदगीरच्या चेरमनपदी धनाजी राजे आणि व्हाईस चेरमन माधवराव टेंगेटोल
उदगीर (प्रतिनिधी) : श्री संत गोरोबा नागरी सहकारी पतसंस्था म.उदगीर यांच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची अधिसभा एस टी मुंडे निवडणूक निर्णय अधिकारी,तालुका सहाय्यक निबंधक कार्यालय उदगीर यांच्या अध्यक्षतेखाली होऊन या संस्थेच्या चेरमनपदी धनाजी विठ्ठल राजे तर व्हाईस चेरमनपदी माधवराव गोविंद टेंगेटोल व सचिव पदी बी जी कानपूर्णे यांची निवड करण्यात आली,या अधिसभेस धनाराज पिराजी शिरोळे,बी के घटकार,शंकरराव कानपूर्णे,एन जी कानुरे, वसंत बोनगिरे,सौ कलावती बालाजी कुंभार,सौ शशिकला नारायण लोणीकर हे सर्व संचालक मंडळ उपस्थितीत होते. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
