यशवंत विद्यालयात गुणवंताचा सत्कार

यशवंत विद्यालयात गुणवंताचा सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) : वाढवणा बु.येथील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थाच्या पालकासमेवत त्यांचा सत्कार प्राचार्य प्रल्हादराव जाधव यांच्या हस्ते यशवंत परिवाराच्या वतीने करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थी,विद्यालयातून सर्वप्रथम कोंडेकर पारस संजय 91.60% गुण घेऊन सर्वप्रथम आला आहे. तरवडे वैभव वामन 89.80% गुण घेऊन द्वितीय आला आहे. पांचाळ गणेश शिवानंद 87.20% गुण घेऊन तृतीय आला आहे. तर मुलीमध्ये प्रथम कु. नाईकवाडे संध्या अनिल कुमार 84% गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे.

या सर्व गुणवंत विद्यार्थाचा सत्कार करून त्यांचा भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.या वेळी विभाग प्रमुख प्रा. विरभद्र बिरादार, प्रा.मनोजकुमार माने, किशनराव ढोकाडे, हंबीर साधू, मंगेश सरदार, जहागीदार एन. एम., मुल्ला, नवनाथ मोरे, ज्ञानेश्वर बाऱ्हाळे, संदीप उडत्तेवार, प्रा.रमेश केंद्रे, प्रा. संदीप तोडकर, प्रा. उमाकांत कांबळे, प्रवीण भिंगोले, प्रा. जयराज बुर्से, प्रा.अभिजित डांगे, प्रा. पल्लवी वलसे, प्रा.रविकिरण कांबळेे, प्रा. प्रविण रेड्डी, संतोष सोमासे, रामचंद्र डावळे, राहुल जाधव आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!