नव युवक मित्र मंडळ शेनी यांच्या वतीने कै. गोपीनाथराव मुंडे यांची पुण्यतिथी साजरी

नव युवक मित्र मंडळ शेनी यांच्या वतीने कै. गोपीनाथराव मुंडे यांची पुण्यतिथी साजरी

अहमदपूर( गोविंद काळे ) तालुक्यातील शेनी येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री तथा ग्रामविकास खात्याचे केंद्रीय मंत्री भाजपा नेते लोक नेते कै. गोपीनाथराव मुंडे यांची पुण्यतिथी दि ३ जुन रोजी नव युवक मित्र मंडळ शेनी यांच्या वतीने साजरी करण्यात आली
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूर संचालक यशवंत केंद्रे सामाजिक कार्यकर्ते राम जायभाये पत्रकार गोविंद काळे आदी मान्यवरांच्या हस्ते कै. गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्प हार अर्पन करण्यात आला
यावेळी उपस्थित असलेल्या गावातील नव युवक मित्र मंडळाच्या तरूण मंडळींनी अमर रहे अमर रहे मुंडे साहेब अमर रहे च्या घोषणा दिल्या तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नुकतेच निवडून आलेले महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी क्रॉग्रेस पार्टीचे नुतन संचालक यशवंत केंद्रे यांचा गावकऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला
यावेळी गावतील तरुण व वयोवृध्द मंडळी महीला आदींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!