कर्नाटकचे मंत्री ईश्वर खंड्रे यांच्याकडून सावरे कुटुंबाचे सात्वन
भालकी / प्रतिनिधी येथील होतकरू तरूण उद्योजक दिपक मनोहरराव सावरे हे आपला उदरनिर्वाह व घर प्रपंच चालविण्यासाठी तरूण वयातच पुणे येथे गेले असता अचानकच रात्री झोपेत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. कर्नाटकचे वने, परिसर आणि पर्यावरण मंत्री तथा बिदर जिल्हा पालक मंत्री कर्नाटक सरकार ईश्वर बी.खंड्रे भालकीकर यांनी सावरे कुटुंबाच्या घरी जाऊन सांत्वन केले. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भालकी तालुका काँग्रेस अध्यक्ष हनुमंतराव चव्हाण, शिवकुमार राजभवन, प्रसिद्ध उद्योजक चनबसवा बळते, राजगोपाल बियाणी, काँग्रेस चे युवा नेते गोरखनाथ श्रीमाळे, पंचशील पाटील, कुमार स्वामी, ॲड.संतोष नेलवाडे, अमोल पांढरे, आरीफ शेख यांच्यासह सावरे कुटुंबातील युवा उद्योजक तथा मंत्री ईश्वर बी.खंड्रे यांचे कट्टर समर्थक दत्तात्रय मनोहरराव सावरे, दत्ता काटकर, बालाजी काटकर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.