सेवानिवृत्त सैनिक राजेश केंद्रे यांचा सत्कार
अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील रुद्धा येथील जवान राजेश बजरंग केंद्रे ही भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत होते ती सतरा वर्ष सेवा पूर्ण करून निवृत्त झाले त्या निमित्ताने रुद्धा तालुका अहमदपूर येथे ‘सेवा सत्कार सोहळा’ आयोजन करण्यात आला होता.
सर्वप्रथम सेवानिवृत्त जवान राजेश केंद्रे यांची अश्व रथा मधून श्री साई गणेश स्टडी पॉईंट अहमदपूर येथून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून भव्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. जेसीबी द्वारे गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी अहमदपूर मधील चौकामध्ये महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर रुद्धा पार्टी येथे अशोक काका केंद्रे माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी भव्य स्वागत केले. त्यानंतर मोटरसायकल रॅली काढण्यात आली गावामध्ये प्रवेश केल्यानंतर वृक्ष लावले, घरोघरी दारामध्ये पुष्पहार व आरती करून स्वागत करण्यात आले.
हनुमान मंदिर रुध्दा येथे सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून गणेश दादा हाके प्रदेश प्रवक्ते भाजपा तर प्रमुख पाहुणे म्हणून हनुमंत देवकते तालुका अध्यक्ष भाजपा तसेच व्यासपीठावर सरपंच गजानन चंदेवाड, उपसरपंच नाथराव केंद्रे, माजी सरपंच पांडुरंग केंद्रे, सत्कारमूर्ती राजेश केंद्रे, पत्नी अनिता केंद्रे, आई पदमीनबाई केंद्रे यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गावकऱ्यांच्या वतीने सेवानिवृत्त सैनिक राजेश केंद्रे यांचे शाल श्रीफळ पुष्पहार व फेटा बांधून नागरी सत्कार करण्यात आला.
यानंतर माझी सैनिक संघटना तसेच इतर संघटना सर्व मित्र परिवार नातेवाईक यांच्याकडून पेढे भरून स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सतीश केंद्रे यांनी मानले तर हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.