ना. बचुभाऊ कडू यांच्या वाढदिवस उदगीर तालुका येथे विविध कार्यक्रमाने साजरा

ना. बचुभाऊ कडू यांच्या वाढदिवस उदगीर तालुका येथे विविध कार्यक्रमाने साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : दिव्यांग कल्याण मंत्रालय अध्यक्ष ना. बचुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त देवर्जन येथे शाखा फलक अनावरण करण्यात आले. शहराध्यक्ष महादेव मोतीपवळे यांच्या वतीने समता नगर येथील महादेव मंदिर गार्डन येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच प्रहारसेवक संदीप पवार यांच्या बाबासाहेब नाईक बंजारा शिक्षण प्रसारक मंडळ बोरताळा तांडा द्वारा संचालित विरभान मामा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा मल्लापूर येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच अवलकोंडा येथील दिव्यांगांना सायकल साहित्य वाटप करण्यात आले.

प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर यांच्या वतीने अरुणा अभय ओसवाल ब्लॅंड रिसर्च ट्रेनिंग सेंटर उदगीर येथे प्रहार महिला शहराध्यक्ष जयश्रीताई पाटील यांच्या व महिला पदाधिकारी यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.

प्रमुख उपस्थिती अरुणा अभय ओसवाल ब्लॅंड रिसर्च ट्रेनिंग सेंटर उदगीर निवासी अपंग विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग उपस्थित होते. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे,मार्गदर्शक बंडेप्पा पडसलगे, तालुका अध्यक्ष रविकिरण बेळकुंदे,तालुका संपर्क प्रमुख सुनील केंद्रे, कार्याध्यक्ष महादेव आपटे,शहर अध्यक्ष महादेव मोतीपवळे, महिला जिल्हाध्यक्षा कांचन भोसगे, जिल्हा उपाध्यक्षा प्रेमलता भंडे, तालुका अध्यक्षा विजयमाला पवार, शहर अध्यक्षा राजश्री पाटील,तालुका संघटक चंद्रशेखर बिरादार, तालुका संघटक सोपान राजे, प्रहारसेवक संदीप पवार, तालुका सरचिटणीस शोभा बिरादार, शहर उपाध्यक्ष राजप्रीत अलमखाने, तालुका कार्यकारणी सदस्य बळीराम चौधरी, तालुका सरचिटणीस कुमुदिनी पांचाळ, तालुका संघटक लता कोळी, तालुका उपाध्यक्ष श्रीदेवी बिरादार व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व प्रहार सेवक उपस्थित होते.

About The Author