उदगीरात मनसेचे ” एक सही संतापाची ” अभियान संपन्न

उदगीरात मनसेचे " एक सही संतापाची " अभियान संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर “एक सही संतापाची” ही सह्यांची मोहीम राबवली जात आहे. सद्यपरिस्थितीत महाराष्ट्रात चालू असलेल्या राजकारणाचा ज्या नागरिकांना संताप आला आहे, त्यांनी या मोहिमेत आपली एक सही करून आपला संताप व्यक्त करावा. सध्याचे सत्तेत सहभागी असणारे सर्व पक्ष यांनी विचारधारा, तत्व, धोरणांना मुठमाती देत जनमताचा कौल वेशीवर टांगत चालवलेल्या राजकारणाचा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला किळस आला आहे. कधी नाही एवढ्या खालच्या पातळीचे राजकारण महाराष्ट्रात होताना आपणास दिसत आहे. याच महाराष्ट्रातील राजकारणाचा झालेला चिखल पाहता मनसेने जनतेच्या संतापाला व्यक्त करण्यासाठी एक सही संतापाची हे अभियान राबविले आहे. याच अनुषंगाने उदगीर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात आले. यात शेकडो नागरिकांनी आपली एक सही करून संताप व्यक्त केला. या अभिनयात उदगीर मध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. या अभियानात जिल्हाध्यक्ष संजय राठोड, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, तालुका अध्यक्ष संग्राम रोडगे, जळकोट तालुका अध्यक्ष महेश देशमुख, शहराध्यक्ष संतोष भोपळे, तालुका सचिव सुनील तोंडचिरकर, तालुका उपाध्यक्ष संग्राम केंद्रे, गुरुदत्त घोणसे, मनविसे तालुकाध्यक्ष रामदास तेलंगे, तालुका उपाध्यक्ष योगेश पवार, सतीश सूर्यवंशी, शहर सचिव रोहित बोईनवाड, विभागाध्यक्ष बालाजी पवार, राजू गायकवाड, परमेश्वर भोसले, अविनाश जाधव, दत्ता कारलेवाड, नागेश सांगवी, शरद चिखले आदीसह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

About The Author