मानखेड येथे मनसे कडून अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत खतवाटप

मानखेड येथे मनसे कडून अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत खतवाटप

(जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांचे “मनसे मदत अभियान” )

अहमदपूर ( गोविंद काळे )तालुक्यातील मानखेड येथे भूमिपुत्र मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी मनसे मदत अभियान अंतर्गत दहा अल्पभूधारक शेतकऱ्यांना वीस वीस झिरो या खताचे मोफत वाटप केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयकुमार भिकाणे हे होते तर व्यासपीठावर डीगंबर सांगुळे,ग्रामपंचायत सदस्य बालाजी सांगुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनवीसे जिल्हासंघटक डॉ यश भिकाणे यांनी केले तर सूत्रसंचालन चंद्रशेखर सांगुळे,आभारप्रदर्शन विष्णुकांत सांगुळे यांनी केले.यावेळी शेळके लक्ष्मीबाई,खराबे विजयकुमार, स्वामी सचीदानंद,मुरकुटे उत्तम,रोडगे वैजनाथ,कांबळे दादाराव,गोताळकर प्रयगबाई,सांगुळे माधव,शेख मन्सूर, सांगुळे भागीरथीबाई या अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत खतपोते देण्यात आले.मानखेड ग्रामस्थांनी याबद्दल डॉ भिकाणे यांना धन्यवाद देत या समजउपयोगी अभियानाबद्दल समाधान व्याकव केले.यावेळी कालिदास जाधव,शेशुपाल भिकाणे,अंगद गोताळकर,रमेश जाधव,ज्ञानोबा भिकाणे,गोविंद सांगुळे,दीपक भिकाणे,शिवाजी गोताळकर,तुकाराम तेलंग, ज्ञानोबा तीर्थंकर,प्रदीप खराबे,डिगंबर कांबळे,मैनुद्दीन शेख,बाबू शेख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोविंद भिकाणे,अक्षय गोताळकर, विभागाध्यक्ष गजानन पांगरे,मनवीसे तालुकाध्यक्ष
अतिष गायकवाड,विलास कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

About The Author