महिलांनो अवैध दारूविक्री करणाऱ्यांना चोपून काढा,बाकी मी बघतो – डॉ नरसिंह भिकाणे

महिलांनो अवैध दारूविक्री करणाऱ्यांना चोपून काढा,बाकी मी बघतो - डॉ नरसिंह भिकाणे

निलंगा( गोविंद काळे )लातूर जिल्ह्यात ज्या ज्या गावी अवैध दारू विक्री होते तेथील महिलांनी चंडिकेचे रूप धारण करत दारू अड्डे उद्धवस्त करावे व दारू विक्रेत्यांना न भूतो न भविष्यती चोप द्यावा,बाकी मी बघून घेतो असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी निलंगा विश्रामगृह येथे झालेल्या मनसे महिला प्रवेश सोहळ्यात केले.यावेळी व्यासपीठावर मनसे तालुकाध्यक्ष सुरज पटेल,जिल्हाउपाध्यक्ष प्रदिप शेळके तालुकाउपाध्यक्ष कृष्णा सुरवसे,मनवीसे तालुकाध्यक्ष पार्थ धुमाळ,महिला तालुकाध्यक्ष दोरवेबाई,मनवीसे शहराध्यक्ष ज्ञानसागर म्हात्रे,बालाजी बिराजदार आदी उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ भिकाणे यांनी दारू मुळे अनेक कुटुंब,संसार,जीव उद्धवस्त होत असल्याबद्दल खेद व्यक्त केला व हे बंद होणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.या कार्यक्रमात डॉ भिकाणे यांच्या हस्ते महिलांनी मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.यावेळी
महानंदा कांबळे,सरस्वती कांबळे, आशाबाई लोंढे,अनुसया कांबळे, मंदाबाई कांबळे, सखुबाई लोंढे, लक्ष्मीबाई कांबळे, अंजना कांबळे, शेषाबाई हनमंते, स्वाती कांबळे, सुमनबाई कांबळे, कालींदाबाई कांबळे, सुमित्राबाई कांबळे, भागीरथी कांबळे, लक्ष्मी गायकवाड, वृंदावन कांबळे, रंजना कांबळे, दिपाली कांबळे, रूपाली कांबळे, रुक्मिणी कांबळे, बालिका कांबळे, बबीता कांबळे, गयाबाई कांबळे, जानकाबाई दोरवे, पूजा शिंदे, पूजा चाबूसवार, उषा शिंदे, माया शिंदे, गवळण कांबळे, नंदिनी दोरवे, जानकाबाई दोरवे, सुलोचना कांबळे, अर्चना कांबळे, दैवता कदम, सोनाली वाघमारे, शीला वाघमारे, राऊ कांबळे, शिमता कांबळे, फुलाबाई कांबळे, पारूबाई कांबळे, आशाबाई कांबळे आदींसह अनेक महिलांनी प्रवेश केला.

About The Author