अहमदपूर व उदगीर विधानसभा मतदारसंघाला भरीव मदत करणार – विधानपरिषदेचे गटनेते आ. प्रविण दरेकर.

अहमदपूर व उदगीर विधानसभा मतदारसंघाला भरीव मदत करणार - विधानपरिषदेचे गटनेते आ. प्रविण दरेकर.

अहमदपूर ( गोविंद काळे ) : अहमदपूर व उदगीर विधानसभा मतदारसंघातील नेते व कार्यकर्त्यांनी द्विदा अवस्थेत राहू नये पंतप्रधान नरेंद्र मोदीचे हात बळकट करण्यासाठी व महाराष्ट्र राज्यातील सरकार भक्कम करण्यासाठी काही पक्षाच्या लोकांना सत्तेत सहभागी करून घेतले आहे.भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अहमदपूर व उदगीर विधानसभा मतदारसंघात भरीव मदत करुन पुर्ण ताकद देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी केले.
शिरूर ताजबंद येथील पार्थ लॉन्स येथे आज अहमदपूर – चाकुर विधानसभा मतदार संघाचा
मोदी @ ९ जनसंपर्क अभियाना अंतर्गत लाभार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या भव्य दिव्य मेळाव्याचे उदघाटक म्हणून विधानपरिषदेचे गटनेते तथा महा जनसंपर्क अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आ.प्रवीणजी दरेकर बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्षआमदार रमेश आप्पा कराड हे होते
दरेकर पुढे म्हणाले की आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या देशाचे नाव जगात केले आहे.अनेक धाडसी व समाजाच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या आहेत. देशाला भ्रष्टाचार मुक्त करुन सर्व घटकांना न्याय देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना येणाऱ्या निवडणुकीत आशिर्वाद देण्याचे आवाहन प्रवीण दरेकर यांनी केले.
यावेळी लातूर जिल्ह्याचे जनसंपर्क अभियानाचे प्रमुख लोकप्रिय खासदार सुधाकरजी श्रृंगारे , भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार.रमेश (अप्पा) कराड , अहमदपूर विधानसभा मतदारसघाचे प्रमुख माजी मंत्री विनायकराव पाटील,माजी आमदार बब्रुवान खंदाडे,माजी आमदार सुधाकर भालेराव, यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर माजी सभापती अशोक काका केंद्रे,आर.डी.शेळके,माजी नगराध्यक्ष भारत चामे,राजकुमार मजगे, त्रंबक आबा गुट्टे,भाजपाच्या महीला जिल्हा अध्यक्षा सौ. भाग्यश्रीताई क्षिरसागर,सभापती निळकंठ मिरकले,जिवणकुमार मद्देवाड, माजी सभापती रोहिदास वाघमारे,युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अमोल निडवदे,उदगिर तालुका अध्यक्ष बसवराज रोडगे,बालाजी पाटील,माजी उपसभापती सज्जनकुमार लोणाळे,भाजपाचे चाकुर तालुका अध्यक्ष शिवाजी बैनगिरे , विक्रम काका शिंदे,भागवत सोट, अजय काळे, बापू खलंग्रे, प्रशांत पाटील,अॅड.युवराज पाटील,यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.या मेळाव्याचे संयोजक तथा अहमदपूर चाकुर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी मतदारसंघातील अभियानांतर्गत 30 में ते 30 जून या एक महिन्यात विविध कार्यक्रम घेतल्याची सविस्तर माहिती देऊन अहमदपूर व चाकुर तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट विमा तात्काळ मिळवून देण्याची मागणी यावेळी विधानपरिषदेचे गटनेते प्रविण दरेकर यांच्या कडे केली.
भारतीय जनता पक्षाच्या लाभार्थी व कार्यकर्ता मेळाव्यास अहमदपूर व चाकुर तालुक्यातील जनसागर उसळला होता.
मेळाव्याचे सुत्रसंचालन पुरुत्तम माने यांनी केले तर आभार भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी मानले

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!