श्री वैद्यनाथ आयटीआय हाळम विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी ठरणार टर्निंग पॉईंट – माधव मुंडे

श्री वैद्यनाथ आयटीआय हाळम विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी ठरणार टर्निंग पॉईंट - माधव मुंडे

परळी वैजनाथ ( गोविंद काळे)- तालुक्यातील हाळम येथे दयाधर्म सामाजिक प्रतिष्ठान संचालित श्री वैद्यनाथ आयटीआय विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम घेऊन आले आहे. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष माधव मुंडे यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यात कोणत्याही कॉलेजमध्ये नसलेले दोन अभ्यासक्रम या कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत. श्री वैद्यनाथ आयटीआय मध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण करता येणार आहे. यामध्ये सोलार टेक्निशियन आणि हेल्थ सॅनिटरी (आरोग्य निरीक्षक)हे दोन ट्रेड याठिकाणी उपलब्ध आहेत. याशिवाय इलेक्ट्रिशन (विजतंत्री),वायरमन (तारतंत्री) आदी कोर्सेस पूर्ण करता येतील.
राज्याचे मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा जिल्हा सरचिटणीस माधव मुंडे यांनी ग्रामीण भागातील तरुणांना नोकरी व रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने आयटीआय ग्रामीण भागात उभारून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअरसाठी नव संजीवनी दिली आहे. प्रवेशासाठी काही दिवस शिल्लक असून, विद्यार्थ्यांनी त्वरित प्रवेश निश्चित करावा असे व्यवस्थापनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात महावितरणमध्ये भरती निघणार असून इलेक्ट्रिशियन व वायरमन या कोर्सेस ना मोठ्या प्रमाणात संधी राहणार आहे त्याचप्रमाणे सोलर व हेल्थ सॅनिटरी या ट्रेडसाठी सर्व क्षेत्रात मोठ्या संधी आहेत 100% शासकीय नौकरी मिळेल. श्री वैद्यनाथ आयटीआयची वैशिष्ट्ये म्हनजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व भविष्यकालीन करिअरसाठी दर्जेदार असून यंत्रसामुग्रीसह सुसज्ज व आधुनिक वर्कशॉप, उत्कृष्ट निकाल संस्था देत असून अप्रेंटिस ची हमी संस्थेमार्फत मिळणार आहे तसेच प्रशस्त कॉम्प्युटर लॅब, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकवर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच संस्थेची सुसज्ज अशी भव्य इमारत व ग्रंथालय इंटरनेटचे सुविधा तसेच शैक्षणिक वर्षांमध्ये औद्योगिक सहलीचे आयोजन आदी विद्यार्थ्यांना मिळणार असून, 100% जॉब प्लेसमेंट संस्थेकडून दिली जाणार आहे.
श्री वैद्यनाथ आयटीआय डीजीइटी(DGET) नवी दिल्ली मान्यता प्राप्त आयटीआय कॉलेज आहे. फॉर्म भरलेले विद्यार्थी कॉलेजमध्ये येऊन कागदपत्रे पडताळणी करून घेऊ शकतात. तरी मौजे हळम येथील श्री वैद्यनाथ आयटीआय ला आपला प्रवेश आजच निश्चित करा. अधिक माहितीसाठी ९६०७५१२१११,९१४६०७२१११, ८७६७९७१२१५ क्रमांकावर संपर्क करावा.

…………. चौकट……………..
सोलार टेक्निशियन व हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर हे नवीन ट्रेड श्री वैद्यनाथ आयटीआय कॉलेजची जमेची बाजू

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!