राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा चे बक्षीस वितरण समारंभ संपन्न.

राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा चे बक्षीस वितरण समारंभ संपन्न.

अहमदपूर ( गोविंद काळे )येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा इंग्रजी, गणित, विज्ञान चे बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष गणेश दादा हाके पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून गट साधन केंद्राचे विषय तज्ञ ज्ञानोबा सुकरे, योगीराज आमगे राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा जिल्हा समन्वयक, नवनाथ आगलावे, शारदा जाधव, प्रकाश पवार, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, उध्दव श्रंगारे सह शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी प्रथमतः अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे पुष्पगुच्छ, शाल व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा एन सी ई मध्ये सेंटर रँक व जिल्हा रँक मधील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, मेडल देऊन गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन झाले. या परीक्षेमध्ये रणवीर प्रमोद शिंदे गणित विषयांमध्ये जिल्ह्यामध्ये सहावा व विज्ञान विषयांमध्ये सेंटरमध्ये पहिला, कांबळे श्रेया गौतम गणित विषयांमध्ये जिल्ह्यात सातवी, सुजाता राजाभाऊ सोनकांबळे इंग्रजी विषयांमध्ये जिल्ह्यात सातवी, सांगुळे माही विलास गणित विषयांमध्ये आठवी तर विज्ञान विषयांमध्ये नववी, श्रावणी हरिदास भंडे गणित विषयामध्ये जिल्ह्यात दहावी तर विज्ञान विषयात पाचवी ,संकल्प बाबासाहेब वाघमारे केंद्रात गणित विषयात दुसरा तर विज्ञान विषयात पहिला, प्रसाद दत्ता धोंडगे इंग्रजी विषयात जिल्ह्यात नववा, स्वप्निल तुकाराम डोंबे विज्ञान विषयात जिल्ह्यात दहावा, समीक्षा बळीराम देवरवाड विज्ञान विषयात जिल्ह्यात नववी, उत्कर्षा प्रफुल्ल धामणगावकर विज्ञान विषयात जिल्ह्यात आठवी, विठ्ठल शरद पौळ विज्ञान विषयात जिल्ह्यात नववा, रोहन विनोद वट्टमवार विज्ञान विषयात सातवा, शेख रियाज युसूफ विज्ञान विषयात जिल्ह्यात नववा आदी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे, तरी या यशाबद्दल सर्व शिक्षक व पालक वर्गातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका आशाताई रोडगे तर सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले व आभार संगीता आबंदे यांनी मानले शेवटी पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

About The Author