बचपन -छत्रपती इंग्लिश स्कूलचे 14 व्या वर्षात यशस्वी पदार्पण .

बचपन -छत्रपती इंग्लिश स्कूलचे 14 व्या वर्षात यशस्वी पदार्पण .

शिरूर ताजबंद ( गोविंद काळे ) सृष्टी कल्याण फाउंडेशन अंतर्गत बचपन अँड छत्रपती इंग्लिश स्कूल तेरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रकाश पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष तर संस्था उपाध्यक्ष टी. एन. कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
7 जुलै 2009 रोजी कै .गोविंदराव पाटील यांनी शाळेची स्थापना केली व शाळेने आज यशस्वीपणे 13 वर्षे पूर्ण केली. व 14 व्या वर्षात पदार्पण केले. आजचा तेरावा वर्धापन दिन आपल्या सर्वांच्या सहकार्याने साजरा करताना आम्हाला खूप आनंद वाटला.
शाळा ही शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या तीन आधारस्तंभा वर उभी असते. आम्हा शिक्षकांचा तर सदैव प्रयत्न असतो की, आम्ही आमचा सर्वोत्तम देऊ, पण खरं तर आमच्या समोरील विद्यार्थी हे उत्तमातील उत्तम आहेत.शाळेची ही यशस्वी वाटचाल या गुणी मुलांमुळेच आहे.
कुटुंबाबरोबरच शाळेतुनही मुलांवर संस्कार होतात असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटील सरांनी मांडले तर संस्थेचा यशस्वी प्रवास संस्थाउपाध्यक्ष कांबळे सरांनी आपल्या भाषणातुन सांगितला.
शाळेच्या वर्धापनदिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.इयत्ता 6 वी तील विद्यार्थींनी रुशाली बेडदे व सृष्टी चोबळे यांनी अतिशय सुंदर प्रकारे शाळेचे वर्णन करत संस्थाध्यक्षा व सर्व शिक्षकांचे आभार मानले.
कार्यक्रमाला संस्थाध्यक्षा गिरीजाताई गोविंदराव पाटील, मुख्याध्यापिका शालिनी कुमठेकर , संचालक किशोर कुलकर्णी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शिंदे मॅडम यांनी केले तर शाळेत वर्षभर राबविण्यात येत असलेले उपक्रम व कार्यक्रम या माध्यमातून शाळा विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य प्रभावीपणे कसे करते हे सांगुन कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मुख्याध्यापिका श्रीमती कुमठेकर मॅडम यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाला कुलकर्णी मॅडम, येरमे मॅडम, पस्तापुरे मॅडम, प्रशांत सर, देगुरे सर, पांचाळ सर, आनंदी मॅडम, मयुरी पाटील मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author