लातूरकरांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कायम सहकार्य लाभत आले आहे – राजा मणियार

लातूरकरांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कायम सहकार्य लाभत आले आहे - राजा मणियार

राष्ट्रवादी काँग्रेसची लातूर शहर जिल्हा कार्यकारिणी घोषित

लातूर (प्रतिनिधी) :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लातूरकरांचे कायम सहकार्य लाभत आले आहे. ते यापुढेही लाभत राहील, असा विश्वास राष्ट्रवादीचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार यांनी शुक्रवारी लातुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. यावेळी त्यांनी पक्षाचे  प्रदेशाध्यक्ष  जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त शहर जिल्हा कार्यकारिणीचीही घोषणा केली.

नूतन शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार यावेळी बोलताना म्हणाले की,  पक्षाने आपल्यावर अत्यंत कठीण काळात सोपविलेली  जबाबदारी आपण सर्वांच्या सहकार्याने की सक्षमपणे पेलण्याचा प्रयत्न करू. लातूर शहर जिल्हा कार्यकारिणीत आपण सर्वच घटकातील सदस्यांना सामावून घेऊन एक सर्वसमावेशक कार्यकारिणी निवडली आहे. लातूर शहरातील अगदी बोटांवर मोजण्याइतपत कार्यकर्ते अजित पवारांसोबत गेले असून उर्वरित सर्वच्या सर्व कार्यकर्ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीमध्येच असल्याचे मणियार यांनी सांगितले. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पक्ष ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे आपण सर्व ताकदीनिशी निवडणूक  लढवून पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले. अजित पवारांसोबत  गेलेल्या कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी बनसोडे यांच्या विजयासाठी सहकार्य करणाऱ्यांसोबत त्यांनी प्रतारणा केली असून त्यांचा हिशेब जनताच करेल असे सांगितले.

राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस संजय शेटे यांनी यावेळी बोलताना स्वतःला वाचवण्यासाठी अजित पवार काही सहकार्यांना घेऊन भाजपसोबत सत्तेत गेल्याचे सांगितले. शरद पवारांच्या विचारांशी प्रामाणिक असणारे कार्यकर्ते आजच नव्हे तर कायम शरद पवार यांच्यासोबतच आहेत. पक्ष सोडून गेलेल्यांनी आमच्या परवानगीशिवाय शरद पवार यांचा फोटो लावायचा अधिकार नाही. असे कृत्य करणाऱ्यांवर आपण गुन्हे दाखल करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी राजा मणियार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची शहर जिल्हा कार्यकारिणी घोषित केली ती अशी : उपाध्यक्ष  माजी नगरसेविका सौ.छायाताई चिंदे,  फिरोज सय्यद,शेख फारूख,ऍड.वसंत उगले,पप्पु कासले, शेख इरफान, शेख मुस्तफा,विक्रम कदम, जमील नाना, शेख उस्मान, केशव कातळे, शेख शकिल अमीर हमजा, बाळासाहेब सिरसाठ, शेख समीर अमीरसाब.  सरचिटणीस : माजी नगरसेवक विनोद रणसुभे, ऍड.शेखर हविले, ऍड.प्रदिप पाटील, कोषाध्यक्ष बस्वेश्वर रेकुळगे, सचिव माजी नगरसेविका इरशाद मौलाना तांबोळी, शेख इब्राहिम, जोशी राजकुमार, बरकत शेख, असदमामू खोरीवाले, धुळाप्पा आरबळे, फेरोज पठाण, शेख मतीन, विशाल देवकते, सय्यद जाकीर, पटेल इक्बाल, माजी नगरसेविका अनुसयाताई सुदावळे, सहसचिव माजी नगरसेविका सौ.शोभाताई महादेव धुर्वे, ढाले राहुल, पठाण शहादत, किशोर कांबळे,पठाण फय्याज, संघटकपदी शेख जाकीर इब्राहिम तांबोळी व ईराण्णा पावले संघटक सचिव म्हणून मोईन शेख तर कायम निमंत्रित सदस्य म्हणून माजी खा.जनार्धन वाघमारे सर, प्रदेश सरचिटणीस बस्वराज नागराळकर पाटील, प्रदेश सरचिटणीस आशाताई भिसे, संजय शेटे, मुफ्ती फय्याज व कार्यकारिणी सदस्य म्हणून ऍड.बालाजी कुटवाडे, बागवान मिनहाज, अशोक उपासे, ऍड.अप्पाराव पाटील,पठाण जिब्राईल, धुर्वे महादेव व राजाभाऊ सकपाळ, प्रसिध्दी प्रमुख  ढवारे उमाकांत यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.

या प्रसंगी प्रा.प्रशांत घार. ऍड.शेखर हविले, ऍड.निशांत वाघमारे,जाकिर तांबोळी व डी.उमाकांत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author