‘गर हौसले बुलंद है तो जमाने का डर नही…! ‘

'गर हौसले बुलंद है तो जमाने का डर नही…! '

कवयित्री शाहिदा सय्यद यांची मंत्रमुग्ध काव्य मैफिल !

अहमदपूर, ( गोविंद काळे)
आयुष्याच्या वाटचालीत संकटं, अडचणी, अडथळे हे येतात, जातात. पैकी कोणत्याही बाबी ह्या कायम नसतात. ज्याप्रमाणे ‘पानझड’ होते. आणि त्यातून एखाद्या वृक्षाचा हिरवा गर्द डोलारा जसा उभा राहावा तशाच पद्धतीने आपण आपले आयुष्य उभारले पाहिजे, असे नमूद करताना अहमदपूरच्या प्रसिद्ध कवयित्री शाहिदा सय्यद यांनी ‘पतझड की तरह आती है जाती है मुश्किले पतझड है ! अशा शब्दांत नमूद करुन जगण्यासाठीची लागणारी नवी उभारी आपल्या कवितेतून दिली.
येथील महात्मा फुले महाविद्यालयात सुप्रसिद्ध लेखक समीक्षक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शाहिदा सय्यद यांचे काव्य मैफिल जोरदार रंगली. यावेळी त्यापुढे आपल्या कवितेतून त्या म्हणाल्या-
‘ मुश्किलों से डर के कभी भागना नहीं,
मायूस होके जिंदगी से कभी हारना नहीं,
या प्रसंगी त्यांनी आपल्या ‘प्रतिबिंब भावनांचे ‘ या त्यांच्या काव्यसंग्रहातील मराठी कवितांबरोबरच अनेक उर्दू शेर आणि गजलाही शाहिदा सय्यद यांनी सादर केल्या. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, शाहिदा सय्यद यांची कविता मराठी, हिंदी, उर्दू या तिन्ही भाषांतून आलेली असून या कवितेने मानवी जीवनातील विविध भावभावनांचे पदर उलगडून दाखविलेले आहेत. त्यांच्या कवितांतून मानवी जीवनातील नैतिक मूल्यांचे कलात्मक पद्धतीने उत्तमरीत्या प्रकटीकरण होते असेही ते यावेळी म्हणाले.
या वेळी प्रसिद्ध विद्रोही कवी व समीक्षक डॉ. मारोती कसाब यांनी आपल्या प्रेमाची पेरणी करू या ‘ या आपल्या कवितेतून म्हणाले की,
‘ ते पसरवत आहेत द्वेष
आपण मनं स्वच्छ करू या
ते करताहेत कापणी
आपण लावणी करू या
चला, प्रेमाची पेरणी करू या ‘
ही कविता सादर करून वाहवा मिळवली.
यावेळी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन कवयित्री शाहिदास सय्यद व मारोती कसाब यांचा सत्कार ककरण्यात आला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय ह. भ. प. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.बी.के.मोरे यांनी केले, तर आभार डॉ. सतीश ससाणे यांनी व्यक्त केले. या छोटेखानी कवी संमेलनास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author