लीनेन्स क्लबच्या वतीने स्वच्छता कामगार महिलांचा साडी चोळी देऊन सन्मान

लीनेन्स क्लबच्या वतीने स्वच्छता कामगार महिलांचा साडी चोळी देऊन सन्मान

अहमदपूर ( गोविंद काळे ): येथील लीनेन्स क्लबच्या वतीने स्वच्छता कामगार महिलांचा साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला.

शहरातील नगरपरिषदेच्या अस्थायी स्वरूपावर कार्यरत असलेल्या महिलांच्या सन्मान म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुनंदा कुलकर्णी अध्यक्षस्थानी तर आयोध्या केंद्रे, छाया बहेणजी व ज्येष्ठ पत्रकार उदयकुमार जोशी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी बोलताना लिनेन्स क्लबच्या अध्यक्षा सुनंदा कुलकर्णी म्हणाल्या की लिनेन्स क्लब हे स्वखर्चातून सामाजिक कार्य करते. मागील काळामध्ये शैक्षणिक, स्वच्छता संदर्भात कार्य केले असून आज शहर स्वच्छता करणाऱ्या महिलांच्या कार्यांचा गुणगौरव व्हावा या हेतूने साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे रविकांत क्षेत्रपाळे, प्रा. रत्नाकर नळेगावकर, चंद्रकांत शिंदे, मेघराज गायकवाड, युवराज पाटील, त्रिशरण वाघमारे, गोविंद काळे, प्रा. बालाजी कारामुंगीकर यांचा सत्कार करण्यात आला.

संत ज्ञानेश्वर विद्यालयात लिनेन्स क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी लीनेंस क्लबच्या उषा सुडे, राणी महाजन, नलिनी बेंबळे, शीला घाटोळ, शोभा राजपंके, शीतल महाजन, वंदना केंद्रे, प्रतिभा गोरटे, प्रणिता बिराजदार, पुष्पा तेलंग, राजश्री कोरनुळे, पुष्पा घोटे, रेखा बाळुरे, सुरेखा जोशी यांची उपस्थिती होती.

About The Author