आमदार अभिमन्यू हे तांबाळा शाळेस पाच मिनिट देऊन दीड तास रमले

आमदार अभिमन्यू हे तांबाळा शाळेस पाच मिनिट देऊन दीड तास रमले

औराद शहा (भगवान जाधव) : औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार हे ‘मनरेगातून ग्राम विकास’ हा उपक्रम घेऊन निलंगा तालुक्यातील 68 गावात जाऊन गावक-यांशी संवाद साधत आहेत. गावोगावी जाऊन पारंपारिक शेती पध्दतीत थोडासा बदल करुन शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतक-यांची आर्थिक उन्नती कशी होईल याचा कानमंञ देतआहेत. या दौ-यानिमीत्त त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या विनंतीवरुन तांबाळा गावातील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. शाळेसाठी त्यांनी पाच मिनिटाचा वेळ दिला होता. तांबाळा गावातील जिल्हा परिषदेची शाळा पाहून ते तब्बल दीड तास त्या शाळेत थांबले. शाळेचे मुख्याध्यापक दयानंद मठपती यांनी त्यांचे रोपटे देऊन स्वागत केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण ब्रम्हावाले व उपाध्यक्ष अमृत तुमकुटे यांनी शाळेच्या वतीने त्यांना निवेदन दिले. मागील काळात व सद्या शाळेत राबवत असलेल्या उपक्रमांची त्यांनी माहिती जाणून घेतली. लोक सहभागातून तयार केलेल्या हायटेक कार्यालयाची त्यांनी असे ‘जिल्हा परिषद शाळेचे कार्यालय’ कधीच पाहिले नाही’अशा शब्दांत कौतुक केले. लोक सहभागाबद्दल त्यांनी गावक-यांचे अभिनंदन केले. शाळेचे मुख्याध्यापक दयानंद मठपती यांनी सुरु केलेल्या ‘स्व.देवेंद्र स्वामी कन्यादान योजनेचे’ तोंडभरुन कौतुक केले. शाळेचे अध्यक्ष लक्ष्मण ब्रम्हावाले, उपाध्यक्ष अमृत तुमकुटे, सह शिक्षक श्रीमंत संगनाळे, लक्ष्मण चापाले, नामदेव चोले यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. शाळेची जागा पाहून त्यांनी शाळा परिसरात ‘बिहार पॕटर्न पध्दतीने’ वृक्षारोपन करण्याचे आदेश ग्राम पंचायत कार्यालयातील रोजगार सेवक मुकेश हेब्बाळे यांना दिले. तांबाळ्यात आल्यानंतर कोकणात गेल्याचा आनंद मिळतो हे सांगायला ते विसरले नाहीत. शाळेत उपस्थित सर्वांनी कमीत कमी एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे व पर्यावरणात समतोल राखावा असे आवाहन केले. जाता जाता त्यांनी शाळेत वृक्षारोपन केले. पाच मिनिटाची वेळ देऊन आमदार अभिमन्यू पवार शाळेचे व शाळा परिसराचे वातावरण पाहून तब्बल दीड तास शाळेत रमले. यावेळी तांबाळ्याचे माजी सरपंच सुरेश बिराजदार, माजी उप सरपंच शिवशरण पाटील, नितीन पाटील, ओमकार स्वामी, महारुद्र पसरगे आदी मंडळी यावेळी उपस्थित होते.

About The Author