पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्याची माहिती पत्रक
आ.रमेशआप्पा कराड यांनी ठिकठिकाणी वाटप केले
लातूर (प्रतिनिधी) : जगातील लोकप्रिय नेते देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने केलेल्या विविध कल्याणकारी आणि विकास कामाची माहिती असणारे पत्रक भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड रेणापूर तालुक्यातील खरोळा सह अनेक गावात स्वतः वाटप केले.
सदरील पत्रकाचे वाटप करत असताना भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी शेतकरी, शेतमजूर व्यापारी यांच्यासह सर्व स्तरातील नागरिका समवेत मोदीजींच्या कामाची चर्चा केली, बऱ्याच जणांनी आम्हाला घरकुल मिळाले, शेतकरी पेन्शन योजनेचा लाभ मिळतोय, अनेक दिवसापासून मोफत धान्य मिळाले व इतर योजनेचा लाभ मिळाला असल्याचे अभिमानाने बोलून दाखविले.
खरोळा गावासह इतरही गावात आ. रमेशआप्पा कराड यांनी स्वतः फिरून मोदीजींच्या कार्याची माहिती देणारे पत्रकाचे वाटप केले यातून सर्वसामान्यांच्या भावना जाणून घेता आल्या. सदरील पत्रक वाटप करताना आ. कराड यांच्या समवेत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, प्रदेश सदस्य अनिल भिसे, तालुकाध्यक्ष अँड. दशरथ सरवदे, संगायो समितीचे अध्यक्ष वसंत करमोडे, महेंद्र गोडभरले, भागवत गीते रमाकांत फुलारी यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.