मुख्याधिकारी राठोड त्यांचे कार्य कौतुकास्पद – श्रीमती कलबुर्गे 

मुख्याधिकारी राठोड त्यांचे कार्य कौतुकास्पद - श्रीमती कलबुर्गे 

उदगीर (प्रतिनिधी) : उदगिर नगरपालिकेसाठी अत्यंत कर्तव्यदक्ष आणि उदगीरच्या नागरिकांची काळजी घेणारे मुख्याधिकारी लाभल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग सारख्या भीषण परिस्थिती मध्ये देखील  शहराची परस्थिती नियंत्रणात आणली. भारत राठोड यांच्यासारख्या कर्तबगार अधिकार्‍याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. असे उद्गार श्रीमती उत्तरा कलबुर्गे यांनी काढले. त्या भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या सत्कार प्रसंगी  बोलत होत्या.

 एक कर्तबगार मुख्याधिकारी म्हणून महिला आघाडीच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून सत्काराचे आयोजन केले होते. याप्रसंगी सरोज वारकरे, मधुमती कानशेट्टे, उषा माने, शशिकला पाटील, शिवकर्णा  अंधारे,अनिता बिरादार, भाग्यश्री बिरादार, जयश्री टिळेकर, मंदाकिनी जीवने, बबीता पांढरे इत्यादी प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

About The Author

error: Content is protected !!