दयानंद शिक्षण संस्थेत आर्ट ऑफ लिव्हिंग च्या शिबिराचा आँनलाईन शानदार शुभारंभ

दयानंद शिक्षण संस्थेत आर्ट ऑफ लिव्हिंग च्या शिबिराचा आँनलाईन शानदार शुभारंभ

14000 विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवविणारी देशातील पहिली संस्था कर्मचारी, प्राध्यापक शिक्षक यांचा सहभाग

लातूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दयानंद शिक्षण संस्था व दि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन योग, प्राणायाम व ध्यान शिबिराचे आयोजन बुधवारी करण्यात करण्यात आले होते त्यावेळी उदघाटन समारंभात उद्घाटक म्हणुन रमेश बियाणी म्हणाले की,”शारीरिक ऊर्जा स्त्रोतासाठी योग,प्राणायाम आवश्यक असून दयानंद शिक्षण संस्थेतील संस्था पदाधिकारी, सर्व प्राचार्य, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या निरामय आरोग्यासाठी हे शिबीर निश्चितच उपयुक्त असणार असून दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने आयोजित असे शिबीर आयोजित करणारी दयानंद शिक्षण संस्था ही देशातील पहिली संस्था ठरली याचा आम्हाला अभिमान वाटतो असे प्रतिपादन दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी यांनी केले आहे

याप्रसंगी दि आर्ट ऑफ लिविंगच्या डॉ वसुंधरा गुडे म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे व कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी दि आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक अत्यंत समर्पित भावनेने कार्य करीत आहेत.याचा लाभ सर्वांनी घ्यावा.” याप्रसंगी अँड विवेक वावरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्षीरमणजी लाहोटी हे होते प्रस्ताविक प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड यांनी केले. त्यांनी शिबीर आयोजनाची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ संदीप जगदाळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य अनिलकुमार माळी यांनी केले तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीत विभाग प्रमुख डॉ देवेंद्र कुलकर्णी यांनी प्रेरणा गीत सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे, अधीक्षक नवनाथ भालेराव,डॉ प्रदीप सूर्यवंशी, डॉ संतोष पाटील, सचिन पतंगे, प्रा महेश जंगापल्ले, प्रा इरफान शेख, प्रा. वीणा कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. या ऑनलाईन कार्यक्रमासाठी सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author