लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत नागपंचमी सण उत्साहात साजरा

लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत नागपंचमी सण उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी.उगीले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना हिंदू संस्कृतीतील विविध सणांची माहिती व्हावी म्हणून,नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्कार केंद्रप्रमुख अंकुश निरगुडे,प्रमुख मार्गदर्शक म्हणून सविता बोंडगे,प्रमुख पाहुणे म्हणून विभाग प्रमुख सुधाकर पुलावर, सुरेखाबाई कुलकर्णी व माता पालक संघ प्रमुख सौ.आशालता कल्लूरकरबाई उपस्थित होत्या.

पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून विद्यार्थ्यांनी मातीपासून बनवलेल्या नागराजांच्या मूर्तींचे पूजन करण्यात आले.व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक सौ. सविता बोंडगेबाईंनी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विविध धार्मिक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेमध्येही विद्यार्थ्यांना धार्मिक सणांची माहिती व्हावी म्हणून,विविध सण साजरे केले जातात.आपला भारत देश विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. पृथ्वीवरील सर्व घटक देवतुल्य आहेत. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये सर्वांची व्यक्ती,पक्षी,प्राणी व वनस्पतींची पूजा केली जाते.शेतकऱ्यांच्या पिकांचे नागराजा रक्षण करतो म्हणून,नागपंचमी दिवशी नागांची पूजा केली जाते..हा सण चतुर्थी ,पंचमी व षष्ठी या तिथीप्रमाणे तीन दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी माहेरी आलेल्या मुली आपल्या मैत्रिणींना भेटतात.त्यांच्याशी सुख दुःखाच्या गोष्टी करतात.फुगडी भुलई,झोका इत्यादी विविध खेळ खेळतात व नागराजाची मनोभावे पूजा करतात. प्रत्येक व्यक्ती आणि प्राण्यांपासून आपल्याला काही चांगले गुण मिळतात. त्या गुणांचा आपण स्वीकार केला पाहिजे असे मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी आपला देश हा कृषिप्रधान देश आहे.नाग हा शेतकऱ्यांच्या शेतातील उंदरांचा नाश करून पिकांचे रक्षण करतो, म्हणून सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात.साप हा स्वच्छताप्रेमी आहे.त्याच्यापासून आपण स्वच्छतेचा गुण घेतला पाहिजे.सापासंबंधी असलेले गैरसमज दूर केले.

शाळेतील सर्व मुली व महिला शिक्षीकांनी पारंपरिक गाणी म्हणत,फुगडी व भूलईचा आनंद लुटला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.सोनिया देशपांडे यांनी केले तर, आभार सौ.श्रीदेवी कबाडेबाईंनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

About The Author