विद्यार्थ्यांनो पात्र मतदारांनो मतदार यादीत नाव नाही, तातडीने नोंदणी करा

विद्यार्थ्यांनो पात्र मतदारांनो मतदार यादीत नाव नाही, तातडीने नोंदणी करा

अहमदपूर( गोविंद काळे ) भारत निवडणूक आयोगाने २१ ते २६ ऑगस्ट दरम्यान मतदार याद्या अद्यावत करण्याचे काम हाती घेतले आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने अद्यावत मतदार यादी वापरली जाणार आहे. दुबार, स्थलांतरित तसेच मयत मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. तसेच १८ वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच पात्र मतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी नाव नोंदनी करावे, असे अवाहन तहसील प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की ,लोकशाही सक्षम बनविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने कोणत्याही महत्वाच्या निवडणुकी अगोदर मतदार यादीचे पुनरिक्षण करण्यात येते. येत्या काही महिन्यात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची मतदार यादी तयार करण्याण्यासाठी अहमदपूर तहसील प्रशासनाच्या वतीने १८ वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कँपचे आयोजन करण्यात आले असून मतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी एका पत्राद्वारे आवाहन करण्यात आले आहे की, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार नोंदणीसाठी दि.०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी २३६ – अहमदपुर विधानसभा मतदार संघ अंतर्गत अहमदपुर तालुक्यातील १९ महाविद्यालय/विद्यालयामध्ये दिनांक २१ ते २३ ऑगष्ट २०२३ व ११ महाविद्यालय/विद्यालयामध्ये दिनांक २४ ते २६ ऑगष्ट २०२३ या कालावधीत उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी २३६ – अहमदपुर विधानसभा संघ, तहसिलदार तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी २३६- अहमदपुर विधानसभा संघ, तालुका अहमदपुर व तालुक्यातील महाविद्यालय/विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने मतदार नोंदणीसह मतदार यादीशी संबंधीत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सदर मोहिमेत महाविद्यालय/विद्यालय मधील सर्व पात्र विद्याथ्याची मतदार म्हणुन नोंदणी करण्यात येणार असुन मतदार असलेल्या विद्यार्थ्याकडुन मतदार यादीतील दुरुस्ती, वगळणी व अन्य प्रक्रियेचे अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.

सदर मोहिम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालय/विद्यालय मधील समन्वय अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ) यांची महाविद्यालय/विद्यालय निहाय नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन मतदार नोंदणीला प्राधान्य देण्यात येत असुन एकुण लोकसंख्येतील युवकांच्या तुलनेत त्यांची मतदार म्हणुन कमी असलेली नोंदणी वाढवण्यास चालना देण्यात येत आहे. यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या १००% पात्र विद्याथ्याची मतदार म्हणुन नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेत जास्तीत जास्त सर्व पात्र विद्यार्थ्यांनी मतदार म्हणुन नोंदणी करावी. असे अहवान प्रविण फुलारी, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी २३६ – अहमदपुर विधानसभा संघ, व शिवाजी पालेपाड, तहसिलदार तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी २३६ – अहमदपुर विधानसभा संघ, तालुका अहमदपुर यांनी केले आहे.

About The Author