जनधन अर्बन क्रे.को ऑपरेटिव्ह सोसायटी ली. बँकेचे डॉ . पट्टदेवरू यांच्या हस्ते उदघाटन
उदगीर(एल.पी.उगीले) : बँकींग क्षेत्रात सामान्य माणसाचे बँकेशी विश्वासाचे नाते असले पाहिजे. सर्वसामान्य माणसाचा आर्थिक विकास जनधन अर्बन क्रे.को ऑपरेटिव्ह सोसायटी ली. बँकेच्या माध्यमातून साधला जाईल. यातूनच जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळू शकेल.जिल्ह्यातील छोटे व्यावसायिक, शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजेत, हा दृष्टीकोन जनधन अर्बन क्रे.को ऑपरेटिव्ह सोसायटी ली. बँकेने ठेवला आहे. बँकींग व्यवसायात सातत्याने नवनवीन प्रयोग करणे आवश्यक आहे.यासाठी उदगीर येथे आडत लाईन नवा मोंडा उदगीर येथे जनधन अर्बन क्रे.को ऑपरेटिव्ह सोसायटी ली. बँकेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बँकेचे उदघाटन, शुभारंभ व दीप प्रज्वलन प.पू.श्री डॉ.बसवलिंग पट्टदेवरू यांच्या हस्ते करण्यात आले. व तसेच पादपूजन स्वागत संस्थेतर्फे चेअरमन सिद्धेश्वर ममदापूरे यांनी सपत्नीक केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मल्लेश झुंगा,प्रास्ताविक एड.सुरेशजी महालिंगप्पा मुदुडगे व आभार प्रा. शांतवीर स्वामी यांनी मानले.यावेळी बँकेचे सांस्थपक अध्यक्ष सिद्धेश्वर बसवराज ममदापुरे,उपाध्यक्ष बसवराज श्रीपतराव बिरादार,सचिव जयप्रकाश शिवरुद्र डांगे,कोषाध्यक्ष दीपक अण्णाराव शेटकार,संचालक अशोक वैजनाथ हळळे,संचालक शिवराज पंडितराव पाटील,संचालक शांतवीर सिद्राम स्वामी,संचालक स्वेता सिद्धेश्वर ममदापुरे,संचालक सुवर्णा उदय ममदापुरे,संचालक मनोज प्रदीप हावा,संचालक सुरेश महालिंगप्पा मुदुडगे,संचालक महेशसिंग विश्वनाथसिंह पवार,संचालक मोहन शिवाजी बिरादार हे होते.या उदघाटन कार्यक्रमास संत तुकाराम विधी महाविद्यालयांचे प्राचार्य ॲड राजकुमार नावंदर,ॲड. अमोलजी तलवाडकर,ॲड. वसंतरावजी बोडके,ॲड. नाझीम पटेल,ॲड. चंद्रशेखर भोसले,बाबुरावजी पांढरे,माजी नगरसेवक राहुल रमेश आंबेसंगे व मित्रमंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.