ङोगंरशेळकी ( तांङा ) येथील कृषि महाविद्यालयाचे बुद्धिबळ स्पर्धेत नेत्रदीपक यश
उदगीर (एल.पी.उगीले) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ , परभणी अंतर्गत नंदिग्राम कृषी एवम ग्रामविकास संस्था , सुगाव संचलित कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी ( तांडा ) ता. उदगीर येथे आंतर – महाविद्यालयीन बुद्धिबळ (मुले – मुली) स्पर्धा दि.२२ व २३ ऑगस्ट , २०२३ रोजी , या महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आल्या होत्या . सदरील स्पर्धेमध्ये मराठवाड्यातील बहुतांश घटक व संलग्नित कृषी महाविद्यालयांचे संघ सहभागी झालेले होते .
या बुद्धिबळ स्पर्धांचे उद्घाटन दि. २२ ऑगस्ट रोजी , वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सचिन मोरे आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते , हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक व सरस्वती यांच्या प्रतिमानां पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलनाने करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ङॉ. संग्रामजी पटवारी (अध्यक्ष, नंदिग्राम कृषी एवम ग्रामविकास संस्था , सुगाव ) , प्रमुख पाहूणे म्हणून संस्थेचे सचिव गंगाधररावजी दापकेकर , कृषी विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी प्रा . देवीसिंग राठोङ व शाहूराज चव्हाण , बुद्धिबळ निवड समितीचे प्रमुख ङॉ. दिलीप झटे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंगदराव सूर्यवंशी , उपप्राचार्य डॉ. अशोकराव पाटील , जिमखाना उपाध्यक्ष डॉ. वसीम शेख , परभणी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष रविंद्र पंडित इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा उद्घघाटन कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. वसीम शेख यांनी केले. डॉ. सचिन मोरे यांनी , स्पर्धेकांनी खेळाडू वृत्तीने सहभागी होऊन या स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन केले . डॉ.संग्रामजी पटवारी यांनी मार्गदर्शन केले की , विद्यार्थ्यांना दर्जेदार कृषी शिक्षणाबरोबरच त्यांच्यातील अंगभूत कलागुणांना विकसित करण्यासाठीच्या उदात्त हेतूने महाविद्यालय अशा विविध स्पर्धांचे सातत्याने नियोजन व आयोजन करीत असल्याचे नमूद केले .
या दोन दिवशीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये , ङोगंरशेळकी ( तांङा ) येथील कृषि महाविद्यालयाच्या संघाने अंतीम फेरीतील अटीतटीच्या सामन्यात १० गुणांसह प्रथम क्रमांक पटकावून विजेता संघ आणि प्रतिस्पर्धी कृषि महाविद्यालय , परभणीचा संघ उपविजेता म्हणून घोषित करण्यात आले .
पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव गंगाधररावजी दापकेकर व प्रमुख पाहुणे विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सचिन मोरे यांच्या हस्ते आणि ईतर मान्यवरांच्या उपस्थितीत , विजेत्या , व उपविजेत्या संघास ट्रॉफी व पदके बहाल करून सन्मानित करण्यात आले .