1 कोटी 25 लाख रुपयाच्या विविध विकास कामाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्धाटन
अहमदपूर (गोविंद काळे): नागरी दलितेतर योजने अंतर्गत एक कोटी 25 लाख रुपयाच्या विविध विकास कामाचे उद्घाटन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते रविवारी ( ता.20 ) करण्यात आले
यावेळी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, शिवानंद हेंगणे, माधवराव जाधव, निवृत्ती कांबळे, मुजीब पटेल, अजहर बागवान, अश्विनी कासनाळे, मीनाक्षी शिंगडे, निवृत्ती कांबळे, दयानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मिरकले नगर ( 10 लाख ), नागोबा नगर 10 लाख), छत्रपती शिवाजी नगर टेंभुर्णी ( 10 लाख), त्रिवेणी नगर ( 20 लाख), शिवाजी नगर ( 10 लाख ), जवहार काॅलनी ( 10 लाख), आयोध्या नगर ( एल.आय.सी.) ( 10 लाख) येथील सिमेंट काँक्रीट रस्ता, महात्मा बसवेश्वर नगर नाली ( 10 लाख), आर्य समाज सभागृह, वीरशैव भवन सुशोभीकरण ( 20 लाख) व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोरील रस्ता लोकार्पण (10 लाख ) अशा एकूण एक कोटी 25 लाख रुपयांच्या विविध विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले.
विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले शहरासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला असून शहरातील विविध कार्यालयाच्या इमारती अध्यावत केल्या असून बरीच रस्ते व नाल्या सिमेंट काँक्रीटच्या केल्या आहेत. पुढील काळातही आपणास शहर विकासासाठी मोठा निधी आणावयाचा आहे. शिल्लक राहिलेले कच्चे रस्ते मजबुतीकरण करण्यासाठी प्रयत्नशील असून पुढील काळामध्ये शक्य तेवढा निधी आणून शहर विकास साधणार आहे. मतदारसंघास भरघोस निधी मिळावा या हेतूनेच सत्तेमध्ये सहभागी झालो आहे. सत्तेमध्ये सहभागी झाल्याने रखडलेले कामे सुरळीत झाली तर नवीन कामास गती मिळाली असल्याचे मतही आमदार पाटील यांनी यावेळी मांडले.
यावेळी अशोकराव चापटे, कमलाकर नळेगावकर, तानाजी राजे, सतीश नवटक्के, इमरोज पटवेगर, महेश देवणे, शाहू कांबळे, अनुराधा नळेगावकर, शिवानी कदम, प्रकाश फुलारी, रविशंकर महाजन, संदीप चौधरी, सय्यद अलीम, सय्यदलाल सय्यद सरवर, बालाजी आगलावे, आशिष तोगरे, फिरोज शेख यांची उपस्थिती होती.