नागपंचमी निमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने लावला जनजागरणाचा फलक.
अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यात विविध ठिकाणी नागपंचमीनिमित्त महिलांनी नागदेवताची मनोभावे सोमवारी ( ता.21 ) पूजा केली.
शहरातील एकमेव असलेल्या नागोबा नगर येथील नागोबा मंदिर महिलांनी शेकडो महिलांनी नाग प्रतिमेचे बेलाची पाने, फुल व दुग्धाभिषेक करून पूजन केले व श्रीफळ फोडून मनभावे दर्शन घेतले. नागपंचमीच्या दिवशी दुपारपर्यंत महिलांनी गर्दी केली होती.या मंदिरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व नागराजे गणेश मंडळाच्या वतीने नाग व त्याबद्दलचे समज व गैरसमज या संदर्भातील जनजागरणाचे फलक लावून माहिती सांगण्यात आली. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. रत्नाकर नळेगावकर, नागराजे गणेश मंडळाचे पदाधिकारी किरण शिंदे, सुदर्शन पाटील, नागेश घवटे, नागेश कोईलवाड यांची उपस्थिती होती.