ग्रंथ प्रदर्शनाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
अहमदपूर ( गोविंद काळे) तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
वाचनाची चळवळ वृद्धिंगत व्हावी या अनुषंगाने आयोजित या ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की ज्ञान घेणे म्हणजे सर्व स्तरावर यशस्वी होणे असून ज्ञान समृद्धीही वाचनाशिवाय होत नाही व वाचनासाठी ग्रंथाची आवश्यकता आहे. वाचनाने जीवन जगत असताना आपल्या जगण्याच्या कक्षा रुंदावल्या जातात. वाचनाने मानवाची सामाजिक जीवनातील प्रगती होते. विद्यार्थ्यांना ज्ञानाची भूक असली पाहिजे.ग्रंथालय चळवळ वाचन संस्कृती वाढवणे ही काळाची गरज असून सध्या वाचन संस्कृती ही लोपं पावत चालली आहे. वाचन संस्कृती वाढली तरच खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत निर्माण होणार आहे. समाजाचा इतिहास आणि भविष्य ग्रंथालयामध्ये दडलेले आहे.
शालेय पुस्तकांसोबत विद्यार्थ्यांनी इतर माहितीचे ग्रंथ वाचावेत. असे आवाहनही आमदार बाबासाहेब पाटील यांनी यावेळी केली.
यावेळी प्रा.द.मा माने, प्राचार्य एन.एस पाटील , मुख्याध्यापक दिपक भराटे, अभिजीत औटे, दिपाली औटे, प्राचार्य यादव कर्डीले, प्रा.व्यंकटराव कदम, प्रा.हिरामण पुसदेकर, प्रा. राहुल वाघमारे, ग्रंथालय किसन तेलघाने, ग्रंथपाल एल.बी.सूर्यवंशी, ज्ञानोबा पाटील, बालाजी गोरे, नागनाथ मदनुरे, दस्तगीर तांबोळी, सायराबी सय्यद यांची उपस्थिती होती.