पु अहिल्यादेवी विद्यालयात नागपंचमी निमित्त रंगली भुलई,फुगडी
अहमदपूर( गोविंद काळे ) तालुक्यातील सांगवी सु येथील पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज नागपंचमी निमित्त भारतीय संस्कृतीला अनुसरून लोप पावत चाललेल्या ग्रामीण खेळांना संस्थेच्या सचिव तथा भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस प्राचार्या रेखाताई तरडे हाके यांच्या संकल्पनेतून उजाळा मिळाला. पूर्वी नागपंचमीच्या निमित्ताने महिला भगिनी एकत्र येऊन भुलई, फुगडी,झोका आदी खेळ खेळत असत. पण पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण जास्त झाल्याने अशा सणांना अनुसरून अनेक ग्रामीण भागातील खेळ नाहिसे होताना दिसते.पण पु अहिल्यादेवी विद्यालयात स्वतः प्राचार्या रेखाताई तरडे हाके यांनी पुढाकार घेऊन शाळेतील महिला शिक्षिका दैवशाला शिंदे,कौशल्या देवकते, तेजस्विनी फाजगे यांच्या सोबत शाळेतील ज्या मुलींना शक्य आहे त्यांनी नऊवारी साड्या परिधान करून येण्यास सांगितले असता सर्व मुलींनी भारतीय परंपरेस अनुसरून नऊवारी साड्या परिधान करून आल्या होत्या.त्यामुळे शाळेचा परिसर अगदी फुलुन दिसत होता.यावेळी सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका शिवालिका हाके यांनीही परिश्रम घेवून भुलई,फुगडी,झोका आदी खेळ खेळत भारतीय संस्कृतीला साजेसे सर्वच खेळ मुलींसोबत खेळले.