सामूहिक संघर्षातूनच गावाचे नंदनवन फुलते -प्रा.मारोती बुद्रुक पाटील

सामूहिक संघर्षातूनच गावाचे नंदनवन फुलते -प्रा.मारोती बुद्रुक पाटील

25 मुलांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

अहमदपूर ( गोविंद काळे) संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येतात सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करा.गावकऱ्यांच्या आणि युवकांच्या सामूहिक संघर्षातूनच गावाचे नंदनवन फुलते असे प्रतिपादन प्रख्यात निवेदक,शिवव्याख्याते प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी केले.
रोकडोबा ग्रामदेवताच्या परचंडा भूमीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व आदर्श गांवाच्या विकासाचा आराखडा या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रा.मारोती बुद्रुक पाटील बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शिवनंदा हिप्परगे, प्रमुख उपस्थितीतत
उपसरपंच कुशावर्ता कदम,सदस्य संदीपान वाघमरे,अनुसया ठाकूर,रत्नमाला रेड्डेवाड,धनाजी जाधव,गैबीसाहब पठाण,शिवकुमार हिप्परगे,तुकाराम जाधव रंगनाथ तराटे,
संभाजी सोनकांबळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना बुद्रुक पाटील म्हणाले की सद्यस्थितीला प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा वाढलेली असून आजच्या युवा पिढीने नवे आव्हानं स्वीकारून जिद्द,चिकाटी,परिश्रम आणि मुक्त अभ्यास च्या जोरावर यशप्राप्ती करावी.कुठलेही क्षेत्र अवघड नाही परिश्रम केल्यावर आपल्याला ते सहज सोपे करता येते.परचंडा गावाला मिळालेला आदर्श गाव पुरस्कार हा आपल्या सर्वांच्या परिश्रमातूनच मिळाला आहे यापुढेही महाराष्ट्र शासनाचा आदर्श गाव पुरस्कार आपल्या सर्वांच्या कार्य कर्तुत्वातून मिळेल यात शंका नाही.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे.युवाशक्‍ती ही गाव व देश विकासाची खरी शिल्‍पकार असल्याचे प्रा.मारोती बुद्रुक पाटील म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रस्तावित शिवकुमार हिप्परगे यांनी केले यावेळी त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न आणि यापुढेही गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपल्या सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करणार असल्याचे समजते कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन व आभार रामदास रेड्डेवाड यांनी म्हणले. कार्यक्रमाच्या शेवटी 25 मुलांनी आयुष्यभर निर्व्यसनी राहणार असल्याची शपथ घेतली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य व गावातील युवा तरुणांनी प्रयत्न केले.

About The Author