महात्मा फुले महाविद्यालयात विशेष मतदार नोंदणी शिबिर संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी कार्यालय लातूर, उपविभागीय कार्यालय अहमदपूर व तहसील कार्यालय अहमदपूर यांच्या सहकार्याने महात्मा फुले महाविद्यालयात तीन दिवसीय विशेष मतदार नोंदणी अभियान शिबिर संपन्न झाले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील व उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि.२१ ते २३ ऑगस्ट २०२३ दरम्यान विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास महाविद्यालयातील युवकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
यावेळी अहमदपूरचे तलाठी एम. जे. गुपिले यांच्यासह पी. एस. गायकवाड, डी.जी. जाधव, एम. एस. पाटील यांनी बी. एल. ओ. म्हणून काम पाहिले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.