महेश बँकेने सर्वांचे सहकार्य व विश्वासातून उत्तुंग भरारी घेतलेली आहे – आमदार बाबासाहेब पाटील
अहमदपूर( गोविंद काळे ) बँकेतील पारदर्शक कारभार आणि माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची वाटचाल हे मोठ्या प्रगतीकडे खूपच कौतुकास्पद पद्धतीने सुरू आहे.कर्मचारी, सभासद आणि ठेवीदार यांच्या पुर्ण विश्वासातून बँकेने उत्तुंग भरारी घेतली असून सर्व सभासदांना लाभांश हे त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.
महेश अर्बन बँकेची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दीप मंगल कार्यालयात घेण्यात आली असता यावेळी आमदार बाबासाहेब पाटील बोलत होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब जाधव हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार बाबासाहेब पाटील उपस्थित होते. याप्रसंगी उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे ,प्रा. गणपतराव माने,होनराव ,नवनिहालसिंह जहागीरदार ,शिवाजीराव देशमुख, उपसभापती संजय पवार, साहेबराव जाधव, शिवानंद हेंगणे ,माधवराव जाधव ,आशिष गुणाले ,शिवाजी खांडेकर, माधवराव पवार ,सौ संगीता खंडागळे ,सत्यकला जाधव, बालासाहेब पाटील, विनायक भोसले, देवेंद्र जाधव ,उपसरपंच सुरज जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की बँकेची स्थापना ही १९९४ साली झाली असून आज बँकेच्या एकूण पंधरा शाखा कार्यरत आहेत. दोन कोटी ४८ लाख ६५ हजार रुपये सभासदांना लाभांश म्हणून वाटप करण्यात येणार आहे. बँकेच्या दोन इमारती स्वतःच्या मालकीच्या आहेत. जवळपास १२५ कर्मचारी बँकेत निष्ठेने काम करीत आहेत. बँकेत १५ हजार ३७३ एकूण सभासद संख्या असुन या बँकेत गोरगरीब ,कामगार ,कर्मचारी यांच्या ठेवी आहेत. बँकेत स्वच्छ, पारदर्शक कारभार अहल्यामुळे बँकेवर सर्व सभासदांचा, ठेवीदारांचा, कर्जदारांचा विश्वास आहे. कर्मचाऱ्यांना पगारी, बोनस देतो यामुळे अनेक वेगवेगळ्या माध्यमातून बँकेची विकास कामे करीत असून बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची प्रगती होत वाटचाल चालू असून बँकेला दोन पुरस्कार मिळाले असल्याचेही यावेळी सांगितले.
मतदारसंघाचे विकासाच्या बाबतीत बोलतेवेळी म्हणाले की या मतदारसंघात आम्हाला हरितक्रांतीची कामे मोठ्या प्रमाणावर करावयाचे आहेत.शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना भेटून प्रश्न मांडलेला आहे, शेतकऱ्यांसाठी लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून सिंचनाची शेती वाढविण्याची कामे करणे गरजेचे आहे, शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली आली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे, विद्युत प्रश्न सोडवतोय, मतदारसंघाच्या विकासासाठी, जनतेच्या हितासाठी, तालुक्यात आर्थिक परिवर्तन करण्यासाठीच आम्ही अजित दादा पवार यांच्यासोबत गेल्याचे यावेळी सांगितले.
आमदार पाटील पुढे म्हणाले की बारामतीचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून या मतदारसंघात मोठी कामे करावयाची आहेत. या मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करीत असून येथे अध्यात्मिक केंद्र वाढण्याची ही आवश्यकता असल्याचे सांगितले. विज्ञान आणि अध्यात्म हे बरोबरीने असले पाहिजेत. मतदारसंघात निधी जास्त आणून रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात करावयाचे असल्याचे सांगून सर्वांना सोबत घेऊन स्वच्छता, एकात्मता ही कामे करणार असल्याचे शेवटी सांगितले.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे यांनी सर्वसाधारण अहवालाचे वाचन केले तर प्रास्ताविक व बँकेचा आराखडा सिद्राम रंदाळे यांनी वाचून दाखविले. सूत्रसंचालन संभाजी चोपणे, प्रा. मारुती बुद्रुक यांनी तर आभार शिवानंद हेंगणे यांनी मानले.
बँकेच्या वतीने गुणवंताचा सन्मान करण्यात आला तर बँकेच्या मृत सभासदांना शोक संदेश पाळण्यात आला.