जिल्हाधिकाऱ्यांनी कुणबी मराठा संघटनांची बैठक घ्यावी

जिल्हाधिकाऱ्यांनी कुणबी मराठा संघटनांची बैठक घ्यावी

अहमदपूर( गोविंद काळे ) मराठा समाजास कुणबी मराठा जात प्रमाणपत्र मिळण्यास येत असलेल्या अडचणींबाबत लातूर जिल्ह्यातील कुणबी मराठा संघटनेत सक्रीय असलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची त्वरित बैठक घ्यावी, अशी मागणी कुणबी मराठा संघटनेच्या वतीने माजी जि.प.सदस्य माधवराव जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी मराठा व मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यास अनुसरून मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ
उपसमितीच्या दि. १८ एप्रील २०२३ रोजी झालेल्या बैठकीतही याकरीता समिती स्थापन करून अहवाल देण्यासाठी / शिफारशी करण्यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून त्यात जिल्हाधिकारी समितीचे सदस्य आहेत. मराठा समाजाच्या महसूली व शैक्षणीक नोंदी, निजाम काळातील संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, निजाम काळात झालेले करार, राष्ट्रीय दस्ताऐवज व इतर कागदपत्रे मराठा समाजातील लोकांची वंशावळ कुणबी मराठा समाजास कुणबी मराठा व मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबतची माहिती शासनास सादर करण्यापूर्वी जिल्ह्यातील कुणबी मराठा संघटनेत सक्रीय असलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवेदनात नमूद विविध विषयावर विषयावर चर्चा करुन सहानुभूतीने विचार करण्यात यावा अशी कुणबी मराठा संघटनेच्या वतीने अहमदपूर तहसीलदार शिवाजी पालेपाड यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. अहमदपूर शहरातील कुणबी मराठा समाजास अहमदपूर येथील एका शेतकऱ्यांच्या जागेच्या प्रकरणामध्ये दिवाणी न्यायालय, अहमदपूर यांनी कुणबी मराठा समाजास स्मशानभूमीस जागा देण्याचा न्याय देऊन एकप्रकारे न्यायालयानेही कुणबी मराठा समाज असल्याचे मान्य आहे.
आपल्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या मनुष्य बळाचा वापर करून कुनबी मराठा समाजाकडून आवश्यक व कुनबी मराठा समाजाकडे सध्यस्थितीत उपलब्ध असलेली माहिती प्राप्त करून घेऊन कुनबी मराठा समाजाला परिपक्व लाभ मिळण्यासाठी शासनास माहिती सादर करण्यात यावी अशी मागणी समाजाच्या वतीने माजी जि.प.सदस्य माधवराव जाधव, संग्राम गायकवाड, यशवंत देशमुख, वामनराव वाडकर, गोविद भगत, ज्ञानोबा सुकरे यांनी निवेदनाद्वारे केली.

About The Author