काँमरेड,अँड.अविनाश पागे यांचे दु:खद निधन.

काँमरेड,अँड.अविनाश पागे यांचे दु:खद निधन.
 अहमदपूर (प्रतिनिधी) येथील  पुरोगामी विचारसरणीचे जेष्ठ, सुप्रसिद्ध, विधीज्ञ अविनाश माणिकराव पागे यांचे अर्धांग वायू चा झटका येऊन मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने वयाच्या  81 व्या वर्षी दि. 24 रोजी पहाटे चार वाजता गुरूवारी राहत्या घरी दुखद निधन झाले.
एडवोकेट अविनाश पागे यांनी पुरोगामी विचार श्रेणीचे जीवनभर समर्थन करून उपेक्षिताना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला होता.ते अहमदपूर नगरपरिषद चे माजी नगरसेवक म्हणून  उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.
 त्यांच्या वर दि.24 रोजी सांयकाळी पाच वाजता शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.
 त्यांच्या पश्यात पत्नी, एक मुलगी, दोन मुले, नातू असा मोठा परीवार असून प्रसिद्ध सोनोग्राफी तज्ञ डॉ. अमोल पागे आणि अमेरिकेत अभियंता असलेले सुशिल पागे यांचे ते वडील होत.
त्यांच्या दु:खद निधना बद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About The Author

error: Content is protected !!