4 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन
उदगीर (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर पोलीस प्रशासनाच्या वतीने अमानुष लाठी चार्ज करण्यात आला. या घटनेचा निषेध नोंदवून लाठी चार्ज करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना तात्काळ बडतर्फ करावे. या मागणी सोबतच सद्यस्थितीत उदगीर विधानसभा मतदारसंघ दुष्काळाच्या खाईत लोटला जात असल्यामुळे, शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. तसेच या दुष्काळी परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. यासोबतच इतर अनेक मागण्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाच्या) वतीने चार सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलनाला सुरुवात होणार आहे. उदगीर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, युवक राष्ट्रवादी काँग्रेस, महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी, पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी, नगरसेवक, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य या सर्वांनीच उपस्थित रहावे. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) तालुकाध्यक्ष प्रा.डॉ. शिवाजी मुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर शहर चे कार्याध्यक्ष गजानन सताळकर यांनी आवाहन केले आहे.