लाल बहादुर शास्त्री विद्यालयाचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उज्वल

लाल बहादुर शास्त्री विद्यालयाचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उज्वल

उदगीर (प्रतिनिधी) : तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन छत्रपती शाहू सैनिकी स्कूल उदगीर येथे करण्यात आले होते. या मैदानी स्पर्धेत लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे शाळेच्या वतीने विजयी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या क्रीडा स्पर्धेत आदित्य जाधव (100 मी. व 600 मी). धावणे प्रथम, केतकी पाटील 100मी.धावणे, 80 मी. हार्डल्स, प्रथम, वेदिका कोळ्ळे लांब उडी प्रथम, 4X100 मी. रिले,केतकी पाटील, श्रुती जानतीने, वेदिका कोळ्ळे, समृद्धी मुसळे, हर्षदा कोले, रितेश भालेराव 3 कि.मी. धावणे प्रथम 1500 मीटर धावणे द्वितीय, श्रुती भांगे 100 मी. धावणे प्रथम, बुद्धिबळ स्पर्धा प्रथम सिद्धेश्वर जायभाये ,यथार्थ होनराव बॅडमिंटन 17 वर्ष वयोगट मुले प्रथम कृष्णा हंचनाळे ,आदित्य पिचारे , अथर्व शिंदे , तेजस बिरादार , व्यंकटेश रंगदळ या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे. क्रीडा स्पर्धेतील या यशाबद्दल यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक संतोष कोले यांचे मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक कृष्णा मारावार, अभ्यास पूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार यांनी कौतुक केले व जिल्हास्तरीय स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!