समर्थ विद्यालयात वृक्षांना राखी बांधून दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश. स्काऊट गाईड व हरित सेनेचा उपक्रम

समर्थ विद्यालयात वृक्षांना राखी बांधून दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश. स्काऊट गाईड व हरित सेनेचा उपक्रम

उदगीर : तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी स्काऊट गाईड व हरित सेनेच्या वतीने वृक्षांना राखी बांधून वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी, तलाठी सोनाली पकाले, पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रा. बी. एस. बाबळसुरे, रसूल पठाण, हरित सेनेचे पी. ए. केंद्रे, शिक्षिका स्वाती मठपती याच्यांसह विद्यार्थींनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राचार्य प्रमोद चौधरी म्हणाले की, वृक्ष संवर्धन व जतन करण्यासाठी भारतीय संस्कृतीतील राखी पौर्णिमेचा आदर्श समाजाने घेतला पाहिजे. वृक्षांना राखी बांधून त्याचे संवर्धन व जतन करण्याची जबाबदारी ही घेतली पाहिजे. वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे.

About The Author