मारवाडी युवा मंच अध्यक्ष पदी लक्ष्मीकांत सोमानी तर सचिव पदी ॲड. गोविंदा सोनी
उदगीर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मारवाडी युवा मंच उदगीर शाखेच्या नूतन कार्यकारिणी ची निवड सर्वानुमते करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी लक्ष्मीकांत सोमानी तर सचिव पदीॲड. गोविंदा सोनी यांची निवड करण्यात आली.
सम्पूर्ण देशात अग्रणी असलेल्या अखिल भारतीय मारवाडी युवा मंच उदगीर शाखेची 2021-22 या वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. त्यात अध्यक्ष पदी लक्ष्मीकांत रामेश्वर सोमानी,उपाध्यक्ष पदी सतीश प्रेमसुख नावंदर,सचिव पदी ॲड. गोविंदा श्रीनिवास सोनी,सहसचिव पदी सुरेश हरिकिशन तिवारी,कोषाध्यक्ष पदी रोहित सत्यनारायण सोमानी यांची निवड करण्यात आली, मंच चे मार्गदर्शक म्हणून डॉ. रामप्रसाद लखोटिया, ईश्वरप्रसाद बाहेती, श्रीनिवास सोनी, डॉ. प्रवीण मुंदड़ा, जगदीश बाहेती, चंदन अट्टल, रामबिलास नावंदर, विष्णुदास लोया, शिरीष नावंदर, कैलाश मालू, डॉ. भिकमचंद सोनी,राजेश पारिख, सत्यनारायण सोमानी, यांच्या मार्गदर्शना खाली मंच काम करेल,प्रसिद्धि प्रमुख म्हणून रामबिलास नावंदर हे काम पहातील तर मंच च्या अम्बुलस, गरूडवाहन, शवपेटी इत्यादि कामे गोविंद मुंदड़ा, पवन सोनी, पवन मुंदड़ा, अनूप बजाज, अमर सारडा हे पहातील. नूतन पदाधिकार्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.