भा.ज.पा. जिल्हा चिटणीस पदी प्रशांत पाटील यांची निवड

भा.ज.पा. जिल्हा चिटणीस पदी प्रशांत पाटील यांची निवड

देवणी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा चिटणीस पदी प्रशांत पाटील यांची निवड झाल्याबद्दल दवणहिप्परगा या जन्मगावी मित्र परिवार व ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रशांत पाटील बोलताना म्हणाले की पक्ष नेतृत्वानी दिलेली जबाबदारी हे शोभेसाठी नसून या पदाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या माणसाला न्याय देण्याच्या प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी बालाजी बिरादार, दीपक बिरादार माजी सभापती सविता पाटील, व्हा. चेअरमन दैवशाला टिळे ,रंगराव टिळे,तुकाराम टिळे, श्रीमंत तेलगावे, बळीराम टिळे, नितीन तेलगावे, माधव खारीवाले,कुलदीप पाटील, अमोल बिर्गे, प्रल्हाद कारभारी अजित तांबोलकर आदींसह मित्र परिवार उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!