पत्रकार भवन साठी नगरपालिका व्यापारी संकुलात जागा देणार – आमदार बाबासाहेब पाटील

पत्रकार भवन साठी नगरपालिका व्यापारी संकुलात जागा देणार - आमदार बाबासाहेब पाटील

अहमदपूर( गोविंद काळे ) : पत्रकार भवन चे अनेक दिवसाच्या मागणी विचारात घेऊन नूतन नगरपरिषद व्यापारी संकुलात पत्रकार भवन साठी गाळा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितले ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या ओळख पत्र व डायरी वाटपाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे। तहसीलदार प्रसाद कुलकर्णी पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेगणे भाजपाचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव देवकते पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा विश्वंभर स्वामी सह पत्रकार उपस्थित होते यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी पत्रकारांसाठी घरासाठी मरशिवणी येथे म्हाडाच्या कॉलनीत काही घरे आरक्षित करून ती सवलतीच्या दरात देण्यासंदर्भात गृहनिर्माण विभागाकडे पाठपुरावा करून उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले व या बाबत तहसीलदार व नगराध्यक्ष यांना दोन्ही प्रश्नावर त्वरित मार्ग काढण्याच्या सूचना केल्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना अहमदपूर तालुक्यात कुठलीही अडचण येऊ देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले यावेळी उपस्थित मान्यवरांना बिल्व वृक्ष भेट देण्यात आला यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकारी ओळखपत्र डायरी व कॅलेंडर चे प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रा विश्वंभर स्वामी यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन भुसारे रत्नाकर नलेगावकर शिवाजीराव गायकवाड बालाजी पारेकर उदय गुंडीले बालाजी तोरणे पाटील महादेव महाजन मेघराज गायकवाड मासूम शेख अजय भालेराव बालाजी काळे गणेश मदने चंद्रशेखर भालेराव चंद्रकांत शिंदे जगन्नाथ पुणे गोविंद काळे सह पत्रकार मित्र उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारोती बुद्रुक पाटील यांनी तर आभार प्रदर्शन बालाजी कारामुंगी कर यांनी केले

About The Author