अहमदपूरात सराफा व्यापारी यांच्या घरात चोरी सोन्याचे दागिने , पिस्तुलासह २१ लाखाचा माल लंपास
शहरातील चोरी सत्र थांबेना नागरिकांत भिंतीचे वातावरण..
पंधरा दिवसात चौथी घटना..
अहमदपूर,( गोविंद काळे ) : येथील सराफा व्यापा-याच्या घरी चोरट्यांनी सोन्याचे दागिने व एक पिस्टलची चोरी करून जवळपास एकविस लाख रूपयांचा माल लंपास केल्याची घटना घडली आहे.
शहरातील भर वस्तीतील गायकवाड काॅलनी रस्त्यावरील व्यंकटेश नगर येथील सराफा व्यापारी संजय गोविंदराव गोटमवाड यांचे शहरातील सराफा बाजार न्यु विजय ज्वेलर्स नावाचे दुकान असून व्यापारी संजय गोमटवाड यांची मुले शिक्षणासाठी पुणे येथे आहेत पत्नी व मुले पुणे येथे असल्याने अहमदपूर येथील निवासस्थानी संजय गोटमवाड एकटेच राहतात, ते नेहमी प्रमाणे दुकान बंद असल्यानंतर सोन्याची दागिने घरातील लोखंडी कपाटत ठेवत होते. दरम्यान 17 जुन रोजी पहाटे पाच वाजता दुकानातील सोन्याचांदीचे दागीने घरी कपाटात ठेवून घराला कुलूप लावुन पुणे येथे आपल्या कामानिमित्त कुटुंबास भेटण्यासाठी गेले.ते परत शनिवारी (ता.19) रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान अहमदपूर येथील आपल्या निवासस्थानी आले असता बाहेरील गेटचे कुलप काढून घरात मुख्य दाराजवळ गेले असता ते कोंडा तोडल्याचे लक्षात आले.त्यानंतर घराच्या लोखंडी सुरक्षा दरवाज्याचा कोयंडा तुटलेला दिसला व आतील घराच्या दुसरा लाकडी दरवाज्याचे कुलूप हत्याराच्या साह्याने तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे निदर्शनास आले.चोरट्यांनी दागीने ठेवलेल्या कपाटाची चावी घरात अन्य ठिकाणी शोधली व कपाट उघडून विस ग्रॅम वजनाच्या दोन बोरमाळ किंमत 90 हजार, 95 ग्रॅम वजनाचे अष्टपैलू मनी मंगळसुत्र 4 लाख 27 हजार पाचशे, पंचाहत्तर ग्रॅम वजनाचे कानातील झुमके फुले दहा जोड 3 लाख 37 हजार पाचशे, एकतीस ग्रॅम वजनाचे दोन नेकलेस एक लाख 39 हजार पाचशे, सत्ताविस ग्रॅम वजनाचे सात वेढ किमंत एक लाख 21 हजार पाचशे, छप्पन ग्रॅम वजनाचे आठ पेन्डाल दोन लाख बावन्न हजार, 20.3 ग्रॅम वजनाचे एक लाॅकेट नव्वद हजार, 54.3 ग्रॅम वजनाचे नऊ जोड गोल फुलं दोन लाख 43 हजार, 37 ग्रॅम वजनाचे सेवन पिस, सरपाळे व नथणी एक लाख 66 हजार पाचशे, 43 ग्रॅम वजनाचे कानातील आकरा रिंग जोड एक लाख 93 हजार पाचशे रूपये, व 40 हजार रुपयाचे एक 0.32 पिस्टल बॅच क्रमांक 163477 जुने वापरते असा एकूण 21 लाख एक हजार रूपये किंमतीची चोरी झाली आहे. फिर्यादी संजय गोविंदराव गोटमवाड वय 45 वर्ष यांच्या तक्रारीवरून अहमदपूर पोलिसात गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लालासाहेब लाकाळ हे करत आहेत.
अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी बंलराज लंजीले,पोलिस निरीक्षक लालासाहेब लाकाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केले. यावेळी
श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते.श्वानाने घराल लगत असलेल्या नगरातील खुल्या जागेतील काळा मारोती मंदिर पर्यंत मार्ग दाखवला.
मागील आठ दिवसात शहरातील विविध भागात तीन ठिकाणी चोरी झाल्याच्या घटना घडल्याने नागरीकात भितीचे वातावरण निर्माण झाले असून गस्त वाढवण्याची मागणी नागरिकातून करण्यात येत आहे.