टोकवाडी येथे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम

टोकवाडी येथे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम

पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे व डॉ. राजाराम मुंडे यांच्या पुढाकारातून लसीकरण मोहिमेत 570 नागरिकांचे लसीकरण

परळी वैजनाथ ( गोविंद काळे) : तालुक्यातील टोकवाडी येथे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या प्रयत्नातून तसेच पंचायत समिती व ग्रामपंचायत टोकवाडी तसेच परळी तालुका आरोग्य विभागामार्फत आज रविवारी दि.20 जून रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या लसीकरण मोहीमेत नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या प्रयत्नातून पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे व डॉ. राजाराम मुंडे यांच्या पुढाकाराने तालुक्यातील टोकवाडी येथील जिल्हा परिषद शाळा येथे 30 वर्षांवरील नागरिकांसाठी आज सकाळी 10 ते 2 वाजताच्या दरम्यान येथे विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेचे मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
कोरोना व्हायरस कायमचा आटोक्यात आणण्यासाठी आणि नागरिकांना त्याची लागण होऊ नये म्हणून लसीकरण करण्यात येत असून याचा एक भाग म्हणून टोकवाडी येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत गावातील 570 पेक्षा जास्त नागरिकांचे कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस घेतला. तसेच आज लस न मिळू शकलेल्या नागरिकांचे लवकरच दुसऱ्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे.राज्याचे सामजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे ,नगर परिषद गटनेते वाल्मिकअण्णा कराड,आरोग्य प्रशासन यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. टोकवाडी येथील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेचा ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळाला. यावेळी पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे, डॉ. राजाराम मुंडे, सरपंच सौ.गौदावरी राजाराम मुंडे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे, नागापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास मोराळे व आदींच्या प्रमुख उपस्थिती होती. मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी टोकवाडी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व ग्रामस्थांनी यांनी परिश्रम घेतले.

About The Author