संत ज्ञानेश्वर विद्यालयात तीन दिवसीय योगा प्राणायाम शिबिर संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या वतीने दि. 18 जून ते 20 जून सकाळी सात वाजता तीनदिवसीय मोफत ऑनलाइन योगा, प्राणायाम व ध्यान शिबिर घेण्यात आले. योगशिक्षक शिवमुर्ती भातांब्रे व महिला पतंजली योग समितीच्या संवाद प्रभारी कलावती भातांब्रे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्था समन्वयक कुलदीप भैय्या हाके, शिवालीका हाके शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे ,मुख्याध्यापक उद्धव श्रंगारे सह शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या शिबिरामध्ये योगशिक्षक शिवमुर्ती भातांब्रे व कलावती भातांब्रे यांनी विविध प्रकारचे योगासन त्यामध्ये ताडासन, अर्ध चक्रासन, धनुरासन, हलासन, उत्तानासन, भुजंगासन, शवासन, सर्वांगासन यांची प्रात्यक्षिक करून घेतली. नियमित योगासन, प्राणायाम व ध्यान करण्याचे फायदे सांगून विविध प्राणायामाचे ही प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच विद्यार्थी व पालकांनी तीनही दिवस मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला. तसेच वर्षभर नियमितपणे योगा, प्राणायाम व ध्यान करण्याचा निश्चय केला. तीन दिवसीय शिबीराच्या समारोप समारंभाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा रोडगे तत्तापुरे यांनी केले सुत्रसंचलन शाळेचे प्रसिद्धी विभाग प्रमुख सतीश साबणे यांनी केले तर आभार नंदकुमार मद्देवाड यांनी मानले.